Satish Shah Death reason: बॉलीवूड व टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेते ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, सतीश मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की, ते आता या जगात नाहीत. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला असून, चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करीत आहेत.

‘या’ गंभीर आजारामुळे झालं निधन

सतीश शाह यांना किडनीच्या तीव्र आजारामुळे नुकतेच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. किडनी हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, ॲटसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. दुखापत, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांमुळे मूत्रपिंड खराब झाल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात विष तयार होते. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही आणि विषारी पदार्थ जमा होत जातात. इथे आज आम्ही तुम्हाला टॉक्सिक किडनीची काही लक्षणं सांगणार आहोत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे.

किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ ५ भयंकर संकेत

भूक कमी लागणं

शरीरात विषारी पदार्थ आणि कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होते. भूक कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सकाळी लवकर मळमळ आणि उलट्या होणे. त्यामुळे माणसाला सतत पोट भरलेले वाटते आणि काहीही खाण्याची इच्छा होत नाही. हे मूत्रपिंडे निकामी होत असल्याचे धोकादायक लक्षण आहे, ज्याकडे सहसा कोणाचेही लक्ष जात नाही.

पायांमध्ये सूज

मूत्रपिंड शरीरातील कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या काम करणे थांबवतात तेव्हा सोडियम शरीरात जमा होते. ज्यामुळे पोटऱ्या आणि घोट्याला सूज येते. या स्थितीला एडेमा म्हणतात. डोळे आणि चेहऱ्यावर सूज दिसून येत असली, तरी त्याची लक्षणे हात, पाय आणि घोट्यांवर सर्वाधिक परिणाम करतात.

त्वचेत कोरडेपणा

त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम नसते तेव्हा असे होते. मग हे विषारी पदार्थ रक्तात जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते, कोरडेपणा येतो आणि दुर्गंधी देखील येते.

थकवा

सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे ही मूत्रपिंडाच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे, व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो. हे मूत्रपिंडात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होते.

सतत लघवी येणं

एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून ६-१० वेळा लघवी करते. वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते. काही लोकांच्या लघवीतूनही रक्त बाहेर येते. खराब झालेल्या किडनीमुळे लघवीमध्ये रक्त पेशी गळती झाल्यानं असे होते.

किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात. लाखो लोक विविध प्रकारच्या किडनीच्या आजारांनी ग्रस्त असतात आणि त्यापैकी बहुतेकांना याची माहितीही नसते. याच कारणामुळे किडनीच्या आजाराला अनेकदा सायलेंट किलर म्हणून संबोधले जाते. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही.