Do’s & Don’t After Sex: सेक्स हा विषय भारतीयांसाठी कितीही प्रायव्हयेट असला तरी त्याबाबतची मते फार सार्वजनिक आहेत. म्हणजे अमुक पद्धतीने सेक्स करावा, तमुक पद्धतीने करू नये, सेक्स आधी काय करावे, काय करू नये. दुर्दैवाने या गोष्टी बहुतांश वेळा अर्धवट ज्ञानावर आधारित असतात. वैद्यकीय सल्ला घेणे आजही अनेकजण टाळतात. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यास संकोच वाटत असेल तर आम्ही तुम्हाला डॉक्टरचा सल्ला या लेखाच्या रूपातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. जरी तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल किंवा नसाल तुम्हाला सेक्सनंतर निदान स्वच्छतेसाठी खालील सहा नियम पाळणे आवश्यक आहे. बहुतांश वेळा उन्हाळयात युटीआयचा धोका वाढतो आणि बहुतांश वेळा यासाठी सेक्सनंतर केलेल्या चुकाच कारणीभूत असतात म्हणूनच सेक्सनंतर नेमकं काय करावं व काय करू नये हे पाहूया…

सेक्सनंतर काय करावे काय करू नये? (Do’s & Don’t After Having Sex)

1) वेबएमडीच्या माहितीनुसार सेक्सनंतर त्वरित आंघोळीला जाण्याची गरज नाही. तुमच्या गुप्तांगांच्या आजूबाजूचा भाग (आत नाही) साध्या कोमट पाण्याने धुवा. तुम्ही सौम्य साबण वापरू शकता, परंतु जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्हाला आधीच संसर्ग झाला असेल तर त्वचा आणखी कोरडी होऊ शकते. शिवाय यामुळे पार्टनरच्या मनावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ सेक्सनंतर तुम्ही लगबगीने आंघोळीसाठी उठून गेल्यास हा अनुभव तुमच्यासाठी आनंदी नव्हता का असा प्रश्न तुमच्या जोडीदाराला पडू शकतो. यापेक्षा काही वेळ जोडीदारासह घालवून मग आंघोळीला जा.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

2) सेक्स केल्यानंतर काही स्त्रियांना असे वाटते की पाण्याने किंवा द्रवपदार्थाने योनीच्या आतील भाग स्वच्छ करणे आवश्यक आहे. याला व्हजायनल डाऊचिंग म्हणतात. यामुळे युटीआय संक्रमण बळावू शकते. सेक्स नंतर तुमचे प्रायव्हेट पार्ट नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात.

3) सौम्य वास येणे सामान्य आहे हे समस्येचे लक्षण नाही. साबण किंवा केमिकल युक्त बॉडी वॉश न वापरता तुम्ही पाण्याने किंवा पेपर टॉवेलने योनी स्वच्छ करूशकता. औषधे, वेट वाइप्स, क्रीम किंवा स्प्रे वापरणे टाळा.

4) सेक्सनंतर बहुतांश वेळा शरीराला पुष्कळ घाम येतो त्यामुळे अगदी घट्ट कपडे घालणे टाळा. कॉटन किंवा सुती कपडे उत्तम पर्याय ठरतील. मोकळे व हवेशीर कपडे घाला

हे ही वाचा<< Sex Life: तुम्हाला वयानुसार किती गरज आहे? किती म्हणजे खूप जास्त? डॉक्टरांचे उत्तर जाणून घ्या


5) सेक्स दरम्यान, जीवाणू तुमच्या मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात. यामुळे संसर्गाची शक्यता वाढू शकते. जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हा तुम्ही ते जंतू बाहेर पडतात. त्यामुळे सेक्स नंतर लघवी करणे टाळू नका.

6) दरम्यान सेक्सनंतर भूक लागू शकते, अशावेळी उपाशी राहू नका. तसेच शरीर डिहायड्रेट होण्याची भीती असते त्यामुळे निदान ग्लासभर पाणी प्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)