मधुमेह हा आजार वेगाने पसरत आहे. प्रौढ व्यक्तीच नाहीत तर आता तरुणांमध्येही या मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. हा आजार झाल्यावर रुग्णाचा आहार आणि जीवनशैलीवर अनेक निर्बंध येतात. यामुळे मधुमेह झाल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. असाच एक समज म्हणजे मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत.

शारीरिक संबंध आणि त्याबाबतीत असणाऱ्या शंका याबाबत आजही आपल्या समाजात मौन पाळले जाते. म्हणूनच या विषयी जागरूकता पसरवण्याची आणि त्यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. अनेकदा लोक शारीरिक संबंधांच्या वेळी त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल आरोग्यतज्ज्ञांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. परिणामी त्यांचे वैवाहिक जीवन उध्वस्त होऊ लागते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

शारीरिक संबंधांमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. हे रक्तदाब कमी करण्यापासून तणाव आणि चिंता कमी करण्यासही मदत करते. मात्र मधुमेह असणाऱ्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत की नाही याबाबत गोंधळ पाहायला मिळतो. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि एमडी शिरीष अवधनुला यांनी स्पष्ट केले आहे की मधुमेहामुळे रुग्णाच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

प्रदूषणामुळे वाढतेय वंध्यत्वाची समस्या; केवळ पुरुषच नाही तर महिलांनाही बसतोय फटका; जाणून घ्या कसा

शारीरिक संबंध रक्तदाब कमी करण्यापासून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. परंतु जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास होत असेल तर, शारीरिक संबंध तुमच्यासाठी तितके चांगले नसतील. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, एंडोक्रिनोलॉजिस्ट शिरीशा अवधानुला, एमडी, स्पष्ट करतात की मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

२०१० साली जर्नल ऑफ डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार ५०% पुरुष आणि १९% महिला मधुमेह असतानाही आपल्या लैंगिक संबंधांच्या समस्या डॉक्टरांना सांगत नाहीत. मात्र असे करणे घातक ठरू शकते. आज आपण मधुमेहग्रस्त रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवावेत की नाही याबाबत जाणून घेणार आहोत.

  • इरेक्टाइल डिसफंक्शन

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, मधुमेहाच्या रूग्णांचे शरीर कमकुवत असते, त्यामुळे त्यांना लैंगिक संबंधादरम्यान इरेक्शनची समस्या जाणवते. पण हे सामान्य आहे. ही समस्या दूर करण्यासाठी या रुग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संशोधनानुसार, मधुमेह झालेल्या २० ते ७५ टक्के पुरुषांना ही समस्या जाणवते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या पुरुषांमध्ये सामान्य पुरुषांच्या तुलनेत इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची संभावना दोन ते तीन टक्क्यांनी अधिक असते. याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव पडू शकतो.

Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा

  • रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन

हेल्थ लाइननुसार, मधुमेह असलेल्या पुरुषांना रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन नावाची समस्या जाणवू शकते. यामध्ये लैंगिक संबंधांच्यावेळी वीर्य लिंगातून बाहेर पडत नाही आणि मूत्राशयात जाते. यानंतर लघवीसोबत वीर्य बाहेर पडते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास त्रास होतो.

मधुमेही रुग्णांनी आपले लैंगिक जीवन कसे सुधारावे?

मधुमेह हा आजार खूपच धोकादायक असून याचा रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे रुग्णाच्या लैंगिक जीवनावर देखील दुष्परिणाम होतात. मात्र, अशा परिस्थितीत काही उपायांचा अवलंब करून रुग्ण आपले लैंगिक आयुष्य सुधारू शकतात.

  • महिलांनी आपल्या मासिक पाळीच्या आधी आणि नंतर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे.
  • पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या जाणवत असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील यासाठी सतत प्रयत्नशील राहावे.
  • नैराश्य आणि मधुमेह एकत्रितपणे रुग्णाचे लैंगिक जीवन उध्वस्त करू शकते. अशा परिस्थितीत नैराश्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवावे आणि स्वस्थ जीवनशैलीचा स्वीकार करावा. गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घ्यावी.