Storing Eggs In Fridge: अनेकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच भरपूर सामान भरून ठेवायची सवय असते. आठवडाभर तिन्ही वेळच्या जेवणासाठी लागणाऱ्या विविध वस्तू म्हणजे भाज्या, वाटण सगळं काही रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी प्लॅन करून ठेवलं की घाईच्या वेळी गोंधळ वाढत नाही. पण असं करताना तुम्ही ज्या वस्तू पटकन वापरण्यासाठी म्हणून तयार करून ठेवता त्या नीट स्टोअर न केल्याने सुद्धा नुकसान होऊ शकते. बहुतांश घरांमध्ये बाजारातून सामान आणलं की जरा पाणी शिंपडून किंवा नावापुरतं स्वच्छ करून फ्रीजमध्ये डबा किंवा पिशव्यांमध्ये भरून ठेवायची सवय असते. पण सरसकट सगळं काही फ्रीजमध्ये ठेवल्यास या वस्तू लवकर खराब होण्याचा शिवाय यामुळे तुमचं कुटुंब आजारी पडण्याचाही धोका असतो. अशीच एक वस्तू म्हणजे अंडी.

अंडी फ्रीजमध्ये साठवून का ठेवू नये?

अनेकांना बरेच दिवस अंडी फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहित आहे का, की अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने बरंच नुकसान होऊ शकतं. अति थंड तापमानामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंड्यांतील पोषक तत्वं नष्ट होतात शिवाय तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी बाहेर काढून उकडल्यावर ती फुटण्याची शक्यता अधिक असते.

अनेकदा अंड्याच्या कवचाला घाण लागलेली असेल आणि आपण न स्वच्छ करताच अंडी फ्रीजमध्ये ठेवली तर अशा वेळी फ्रिजमधील इतर गोष्टींवरही जंतू पसरण्याचा धोका असतो. त्यात जर आपण आधी अंडी फ्रीजमध्ये ठेवून मग बाहेर काढून ठेवली तरी कंडेन्सेशन म्हणजेच अंड्याच्या कवचावर पाण्याचे थेंब तयार होऊ लागतात यामुळे अंड्याच्या कवचावर असलेल्या बॅक्टेरियाचा वेग वाढू शकतो आणि हे जीवजंतू अंड्याच्या आत प्रवेश करण्याची शक्यता देखील वाढते.

हे ही वाचा<< वॉशिंग मशीनच्या स्फोटाचे कारण ठरते ‘ही’ क्षुल्लक चुक; उपाय काय, कसे वाचवाल पैसे? चला पाहूया…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंडी कशी व कुठे स्टोअर करून ठेवावी?

अंड्यांचे ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी ठेवा, कारण जास्त ओलाव्यामुळे अंडी खराब होऊ शकतात. तुम्ही फ्रीजमध्ये अंडी ठेवणार असाल तर एखाद्या हवाबंद डब्यात किंवा बॉक्समध्ये ठेवा, चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून अंडी ठेवू नका.