आतड्याचा कॅन्सर किंवा कोलन कॅन्सराच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते खूप धोकादायक ठरू शकते आणि त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो. जेव्हा मोठ्या आतड्याच्या आसपासच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात तेव्हा हा कर्करोग होतो. चला तर मग जाणून घेऊया हा कॅन्सर तुमच्या हाडांचा नाश कसा करू शकतो.

आतड्याच्या कर्करोगाला कोलन कर्करोग देखील म्हणतात. हा जगभरातील तिसरा सर्वात जास्त होणारा कर्करोग आहे. हा आजार आतड्याच्या आतील भागापासून सुरू होतो आणि हळूहळू ही समस्या शरीराच्या इतर भागांमध्ये वाढू शकते. २०२० मध्ये, आतड्याच्या कर्करोगाची १.९ दशलक्षाहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. आतड्याचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठे आतडे आणि गुदाशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.

Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Tirgrahi Yog In Mesh
१०० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूची होणार युती! त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल आनंदी आनंद

( हे ही वाचा: तुम्हालाही चालताना वेदना जाणवतायत का? असू शकतं कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण, इतर गंभीर लक्षणेही जाणून घ्या)

आतड्याचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरू शकतो का?

या कॅन्सरची माहिती वेळीच न मिळाल्याने तो खूप धोकादायक ठरण्याची शक्यता असते आणि त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो. हा कर्करोग यकृत, फुफ्फुसे, मेंदू, लिम्फ नोड्ससह शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. जेव्हा हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरू लागतो तेव्हा त्याला प्रगत(Advanced) आतड्याचा कर्करोग म्हणतात.

आतड्याचा कर्करोग तुमच्या हाडांमध्ये पसरतो तेव्हा काय होते?

खरं तर हाडांमध्ये कॅन्सर पसरणे अगदी दुर्मिळ असले तरी आतड्याचा कर्करोग तुमच्या हाडांमध्येही पसरू शकतो. ज्याला बोन मेटास्टेसिस म्हणतात. मेयो क्लिनिकच्या मते, हे तेव्हा घडते जेव्हा मूळ ट्यूमरमधील कर्करोगाच्या पेशी तुटतात आणि हाडांमध्ये पसरतात आणि हाडांपर्यंत पोहोचताच या कर्करोगाच्या पेशी अचानक वाढू लागतात. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, हाडांमध्ये पसरणाऱ्या कॅन्सरमुळे हायपरक्लेसीमिया होतो, म्हणजेच तुमच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त होते.

( हे ही वाचा: ‘या’ महिलांना असतो Breast Cancer चा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कोणत्या वयात केली पाहिजे Test)

लक्षणे आणि सेंसेशन

कॅन्सर रिसर्च यूकेने अशा तीन लक्षणांकडे लक्ष वेधले आहे की कर्करोग तुमच्या हाडांमध्ये पसरला आहे हे शोधले जाऊ शकते.

१) थकवा जाणवणे
२) आजारी वाटणे
३) वारंवार तहान लागते

( हे ही वाचा: Uric Acid: यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी चहाचे सेवन चांगले की कॉफीचे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

जेव्हा कर्करोग किंवा ट्यूमर तुमच्या हाडांमध्ये पसरतो तेव्हा त्यामुळे हाडे खराब होतात किंवा कमकुवत होतात. यासोबत यामुळे हाडांमध्ये खूप वेदना होतात. यानंतर, फ्रॅक्चरची शक्यता लक्षणीय वाढते.

हायपरक्लेसीमियाची इतर लक्षणे

एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला हायपरकॅल्सेमिया असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आतड्याचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे वेळीच आपण त्याच्या लक्षणांबद्दल सावध असणे महत्वाचे आहे.

१) पोट खराब होणे
२) उलट्या होणे
३) बद्धकोष्ठता
४) चिडचिड

( हे ही वाचा: हातात दिसणारी ‘ही’ १२ लक्षणे देतात डायबिटीज असल्याचे संकेत; Blood Sugar वाढल्यास हातावर दिसतात ‘या’ गंभीर खुणा)

आतड्याच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

  • मूळव्याधच्या लक्षणांशिवाय स्टूलमधून रक्त येणे
  • ओटीपोटात दुखणे
  • अस्वस्थता आणि सूज येणे

आतड्याच्या कर्करोगाची कारणे

आतड्याच्या कर्करोगाच्या नेमक्या कारणांबद्दल फारसे माहिती नाही. मात्र, अनेक घटक आहेत जे आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की १० पैकी ९ जणांना ६०व्या वर्षी आतड्याच्या कर्करोगाच्या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय आहारात जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूडचा समावेश करणे आणि कमी फायबरयुक्त आहार घेतल्यानेही आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

( हे ही वाचा: शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागल्या वेदना, तर समजून जा कोलेस्ट्रॉल वाढत आहे, जाणून घ्या High Cholesterol ची लक्षणे)

याशिवाय लठ्ठ लोकांमध्ये तसेच दारू, सिगारेट इत्यादी सेवन करणाऱ्यांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचा धोका खूप जास्त असल्याचे आढळून येते. तुमच्या कुटुंबात आतड्याच्या कर्करोगाचा इतिहास आधीच असला तरीही तो होण्याचा धोका खूप जास्त असतो.

डॉक्टरांना कधी भेटायचे

NHS च्या मते जर तुम्हाला तुमच्या शरीरात वरील लक्षणे ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसली तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. याशिवाय जर तुमच्या शरीरातून डायजेस्टिव्ह वेस्ट बाहेर पडत नसेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांना नक्की दाखवा. जेव्हा तुमच्या शरीरातून टाकाऊ वस्तू बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा तुम्हाला ओटीपोटात दुखणे आणि वजन झपाट्याने कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, तसेच तुम्हाला अनेक आजार होऊ लागतात.

( हे ही वाचा: शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागल्या वेदना, तर समजून जा कोलेस्ट्रॉल वाढत आहे, जाणून घ्या High Cholesterol ची लक्षणे)

आतड्याच्या कर्करोगाचा धोका कसा कमी करायचा?

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने इशारा दिला आहे की जर तुम्हाला आतड्याच्या कर्करोगाचा धोका टाळायचा असेल तर लाल आणि प्रक्रिया केलेले मांस चुकूनही खाऊ नका. त्याऐवजी फायबर युक्त गोष्टींचा आहारात समावेश करा. याशिवाय, आरोग्य संस्थेने निरोगी वजन राखणे, दररोज व्यायाम करणे आणि हायड्रेटेड राहणे देखील सुचवले आहे. कर्करोग टाळण्यासाठी दारू आणि सिगारेटचे सेवन अजिबात करू नका.