Skin Care Tips : गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. गुळात अनेक पौष्टिक गुणधर्मही आढळतात. गूळ खाण्यासाठीही फार स्वादिष्ट आहे. यामध्ये लोह, पोटॅशियम, जस्त, तांबे आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. परंतु गुळाच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात याबाबत अनेकांना कल्पना नाहीये. हे चेहऱ्यावरील डाग आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

गूळ हे एक नैसर्गिक औषध आहे, जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करते. याचा वापर करून तुम्ही सहज चमकदार त्वचा मिळवू शकता. गुळामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात आणि मुरुम कमी करण्यास देखील मदत करतात.

चला तर मग जाणून घेऊयात गुळाचा फेस पॅक कोणकोणत्या पद्धतींना बनवता येऊ शकतो.

गूळ घालून फेस पॅक बनवा

गुळात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. याशिवाय गुळामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रेषा कमी होतात आणि कोरडेपणा आणि खाजही दूर होते. गुळाचा वापर अनेक प्रकारे करता येतो. याच्या मदतीने तुम्ही फेस पॅक बनवू शकता. यासाठी एक चमचा गुळात एक चमचा बेसन आणि एक चमचा दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवा.

गूळ आणि मध स्क्रब

तुम्ही गूळ आणि मध घालूनही स्क्रब बनवू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा गूळ, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून स्क्रब तयार करावा लागेल. हे स्क्रब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि ५ मिनिटांनी चेहरा धुवा.

हेही वाचा >> उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य

गूळ आणि गुलाब पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गूळ आणि गुलाबपाणीचा फेस पॅक बनवण्यासाठी एक कप गुलाब पाण्यात एक चमचा गूळ मिसळा. ते विरघळवून पाणी तयार करा, नंतर ते स्प्रे बाटलीत भरा आणि चेहऱ्यावर स्प्रे करा.