scorecardresearch

Heart Disease: पायांवर सूज येणे हे देखील असू शकते हृदयविकाराचे कारण; ‘ही’ लक्षणे दिसतात वेळीच व्हा सावध

झोपेची कमतरता, निष्क्रिय जीवनशैली, तेलकट आणि जंक फूडचे सेवन, दीर्घकाळ बसणे आणि धूम्रपान करणे यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Heart Disease: पायांवर सूज येणे हे देखील असू शकते हृदयविकाराचे कारण; ‘ही’ लक्षणे दिसतात वेळीच व्हा सावध
पायांवर सूज येणे हे देखील असू शकते हृदयविकाराचे कारण(फोटो: संग्रहित फोटो)

Heart Disease: हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो दिवसातून सुमारे ११५,००० वेळा धडधडतो आणि सुमारे २,००० गॅलन रक्त पंप करतो. हृदयाची धडधड होणे हा आपण जिवंत असल्याचा पुरावा आहे. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि आहाराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी आहार हा हृदयाच्या आरोग्यासाठी आठ तासांच्या झोपेइतकाच महत्त्वाचा आहे. झोपेची कमतरता, निष्क्रिय जीवनशैली, तेलकट आणि जंक फूडचे सेवन, दीर्घकाळ बसणे आणि धूम्रपान करणे यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक आजारांमुळे देखील हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, हृदयाची काळजी घेणे आणि हृदयविकाराची वेळीच लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. शरीरात कोणताही आजार झाला की शरीर त्याचे संकेत देऊ लागते. पायांना सूज येणे आणि दुखणे ही देखील हृदयविकाराची लक्षणे आहेत. चला जाणून घेऊया शरीरात हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत.

( हे ही वाचा: Heart Disease: निरोगी राहण्यासाठी हृदयरोग्यांनी ‘या’ गोष्टी नाश्त्यात खाव्यात; मिळेल भरपूर फायदा)

पाय सुजणे हृदयविकाराची लक्षणे

उन्हाळ्यात पाय सुजणे ही सामान्य समस्या असू शकते. मात्र, तुमचे पाय जर वारंवार सुजत असतील तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. पायांवर सूज येण्याची समस्या जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा चुकीचे व्यायाम केल्याने होते. जर तुमच्या पायांचे दुखणे किंवा सूज कमी होत नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणे गरजेचं आहे. कारण पायांना सूज येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

झोपेचा त्रास हृदयविकाराची लक्षणे

हृदयविकाराच्या स्थितीमुळे झोपेचे विकार होतात. निद्रानाशची समस्या गांभीर्याने घेतली पाहिजे कारण यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ज्या लोकांना झोपेचा त्रास होत असेल त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. झोपेत असताना एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणे हे त्यांच्या फुफ्फुसातील द्रवामुळे होते. छातीत अस्वस्थता, हृदयाची धडधड ही हृदयविकारांची कारणे आहेत.

( हे ही वाचा: Blood Purifying Foods: नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; औषधं-गोळ्यांची गरज भासणार नाही)

हिरड्यांना आलेली सूज देखील हृदयासाठी वाईट

हिरड्यांना आलेली सूज हे सहसा चिंतेचे कारण नसते, परंतु जर तुमच्या तोंडातील अस्वस्थता असह्य होत असेल तर तुम्ही दंतवैद्याकडे उपचार घेणं गरजेचं आहे. दाताचे आणि हृदयाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे हे फार लोकांना माहीत असेल. यासाठी आपल्या दातांची नियमित तपासणी करणे गरजेचं आहे. कारण तोंडाच्या आरोग्याचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

हात आणि शरीराच्या वरच्या भागात वेदना

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की तणावामुळे हात आणि शरीराच्या वरच्या भागात वेदना होतात. पण हे दुखणे हृदयविकाराच्या झटक्याचेही लक्षण असू शकते. काही लोक ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे ते तोंड आणि पाठदुखीची तक्रार करताना दिसतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swelling of the feet can also be a cause of heart disease gps

ताज्या बातम्या