Hartalika Vrat 2022 Importance and Significance : गेल्या अनेक काळापासून प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी महत्वाचा असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाच वातावरण पसरलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून अनेक महिला या काळामध्ये होणाऱ्या हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहेत. हरितालिकेचं हे व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळे या व्रताचं महत्व अनन्यसाधारण आहे.

हरितालिका हे व्रत भाद्रपद शुल्क तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रुपाने मिळावा यासाठी पार्वती देवीने हे व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिलांपर्यंत केलं जातं. विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केलं जातं. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

Hartalika Vrat 2022: हरतालिका व्रत होईल खास; तुमची रास व जन्मतिथीनुसार ‘असे’ निवडा कपड्यांचे रंग

हरितालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. तसंच महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीनं हरतालिकेचं व्रत केलं जातं. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.

Ganesh Chaturthi 2022: गणपतीला दुर्वा अर्पण करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी; सोबतच ‘हे’ मंत्रजप केल्यास मिळेल फायदा

‘हरितालिका’ नावाशी जुळणारे पण वेगळ्या पद्धतीने विधी करण्यात येणारे ‘हरिकाली’ व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं. या हरिकाली व्रतामागे एक कथा आहे, असं म्हणतात. दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली.

Ganesh Chaturthi 2022: घरी प्राणप्रतिष्ठापना करताना डाव्या सोंडेच्या गणेशालाच का दिलं जातं प्राधान्य? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं. फक्त स्त्रियाच नाही पुरुष देखील तिची पूजा करतात. यात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन केले जाते. त्यानंतर पहाट उजाडायच्या आत तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे.

(हा लेख लोकप्रभा मासिकातील ‘चतुर्थी व्रताचा मागोवा’ लेखावर आधारित आहे.)