सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत. यामध्ये कमी वयात कॅन्सर आजार असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीमध्ये तणावाची पातळी देखील जास्त दिसून येते. बघायला गेलं तर २० ते ३० च्या दशकात आपल्याला कर्करोगाविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की १९९० नंतर जन्मलेल्या लोकांना ५० वर्षाआधीच कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कॅन्सर हा एक असा आजार आहे की त्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्याची लक्षणे जाणवताच तुम्ही त्याला टाळूही शकता. मात्र तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करता की ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर सारखा मोठा आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा सवयी वेळीच टाळल्यास तुम्ही कॅन्सरसारख्या आजारापासून वाचू शकता. जाणून घ्या या सवयींबद्दल…

धूम्रपान करू नका

धूम्रपान हे केवळ फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण नाही, तर तोंड आणि घशाच्या कर्करोगासह इतर १४ प्रकारच्या कर्करोगाशी देखील जोडलेले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की अनेक लोक वयाच्या २५ वर्षापूर्वी धूम्रपान करण्यास सुरवात करतात. जर तुम्हाला कर्करोगाचा धोका टाळायचा असेल तर धूम्रपान करू नका आणि तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल तर तुम्ही ती वेळीच सोडली पाहिजे.

( हे ही वाचा: लैंगिक संबंध ठरतंय गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण? दरवर्षी ६७ हजार महिलांचा होतो मृत्यू, अशाप्रकारे घ्या काळजी)

सुरक्षित सेक्स करा

लैंगिक संक्रमित संसर्ग ही जगातील सर्वात सामान्य गोष्ट आहे. यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा, लिंगाचा, तोंडाचा आणि घशाच्या कर्करोगासह अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. एचपीव्ही-संबंधित कर्करोग विशेषतः तरुणांमध्ये प्रचलित आहेत. जननेंद्रियावर चामखीळ मानवी शरीरात मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) मुळे होणाऱ्या विषाणूजन्य त्वचेच्या संसर्गामुळे होतात. ते सहसा वेदनारहित असतात. यामुळे आरोग्यावर कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. मात्र ते अनाकर्षक दिसू शकते आणि त्यामुळे मानसिक निराशा होऊ शकते.

निरोगी वजन राखा आणि दारू पिणे टाळा

जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे स्तन आणि गर्भाशयासारख्या १३ वेगवेगळ्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जास्त वजन असलेल्या लोकांसाठी वजन नियंत्रण खूप महत्वाचे आहे. यासाठी निरोगी शरीर असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या युगात अनेकांना दारू पिण्याची सवय लागली आहे. मद्यपान केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. या कारणास्तव, जर तुम्हाला देखील दारू पिण्याची सवय असेल तर तुम्ही ती सोडली पाहिजे.

( हे ही वाचा: Late Night Eating Habit: तुम्हालाही अचानक मध्यरात्री भूक लागते का? ‘हे’ ४ उपाय करा, पोटही भरेल आणि वजनही नियंत्रणात राहील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्करोगावर उपचार

कर्करोगाचा प्रकार त्याची स्टेज यावर आधारित उपचाराचा पर्याय डॉक्टर ठरवू शकतो. सामान्यतः, कर्करोगाच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी आणि स्टेम सेल प्रत्यारोपण यांचा समावेश होतो.