Fruits Eating Benefits : फळ खाणे प्रत्येकालाचा आवडतं. आरोग्य निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. फळे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. तसंच फळांमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्सही असतात. फळे खाल्ल्यानंतर काही वेळेसाठी तुम्हाला भूखही लागणार नाही. त्यामुळे फळे खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं. फळे कशा पद्धतीने खायची असतात, हे तुम्हाला जोपर्यंत माहित होत नाही, तोपर्यंत शरीरासाठी होणारे फायदे तुम्हाला कळणार नाहीत. त्यामुळे कोणतंही फळ खाण्याची योग्य वेळ आणि अचूक पद्धतीबाबत माहिती करुन घेणं आवश्यक आहे. कामाच्या व्यस्त दिनक्रमात अनेक माणसं कापलेल्या फळांना टिफिनमध्ये ठेवतात आणि दिवसभरानंतर खातात. पण ही पद्धत योग्य आहे? ऑफिसमध्ये किंवा घरात असताना कापलेल्या फळांचं किती दिवसानंतर सेवन केलं पाहिजे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

कापलेल्या फळाचं सेवन कधी केलं पाहिजे? वाचा सविस्तर

फळांना कापल्यानंतर लगेच खाल्ल पाहिजे. जर फळे कापल्यानंतर काही तासांनंतर त्यांचे सेवन केल्यास फळांमधील असणारी पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. कापलेल्या फळांना लगेच खाल्ल्यावर आरोग्यासाठी फायदा होतो. पण काही वेळानंतर या फळांचं सेवन केलं तर शरीरासाठी त्याचे फायदे होत नाहीत. फळांमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. पण कापलेल्या फळांना काही वेळ तसंच ठेवलं, तर त्यामधील पोषक घटक कमी होतात. फळांना कापल्यानंतर खूप वेळ उघडे ठेवल्यानंतर त्यामधील ‘विटामिन सी’चं प्रमाण कमी होऊ शकतं.

नक्की वाचा – ‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्टिफाइड डाएटिशियन आणि सर्टिफाइड डायबिटीज केयर Barbie Cervoni (MS,RD,CDCES,CDN) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरमी, ऑक्सिजन आणि प्रकाश या तीन कारणांनी फळांमधील पोषक तत्व निघून जाण्याची शक्यता असते. न कापलेल्या फळांमधील आतील भाग ऑक्सिजन आणि प्रकाशामुळं सुरक्षित असतं. पण फळे कापल्यानंतर त्यातील पोषक तत्व कमी होतात. कापलेल्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जे पोषक घटक सर्वात जास्त असतं, ते कदाचित विटॅमिन सी असू शकतं. तसंच काही फळांमध्ये असलेलं विटॅमिन ए आणि विटॅमिन इ सुद्धा नष्ट होतात.