Diwali 2022 Cleaning : दिवाळी तोंडावर असल्याने घराची सजावट करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. घरांना रंग दिला जात आहे. लुकलुकणाऱ्या लाइटिंग लाऊन घराला रोषणाई देण्यात येत आहे. घराबाहेरील सुंदरतेबरोबरच आतील स्वच्छताही महत्वाची आहे. ही स्वच्छता करताना अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. जसे, छत, भिंत्या, टाईल्सना लागलेले तेल मसाल्याचे डाग काढणे कठीण होऊन बसते. पण, काही उपायांनी हे डाग मिटवता येऊ शकतात आणि तुमची किचन चकचकीत होऊ शकते. या उपयांबाबत जाणून घेऊया.

१) मीठ

मीठाचा वपर केवळ खाण्यापूर्तीच नव्हे तर स्वच्छतेसाठी देखील होऊ शकतो. स्वयंपाक करताना टाइल्सवर तेल, मसाल्याचे डाग पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यामध्ये दोन ते तीन चम्मच मीठ टाका. त्याचबरोबर थोडं बेकिंग सोडा टाका. आता या पाण्याने टाईल्सवरील घाण स्वच्छ करा.

(गर्भवती असताना डॉक्टरांना विचारूनच घ्या ‘ही’ गोळी, सेवनाने बाळाच्या विकासात येऊ शकते बाधा)

२) व्हिनेगर

स्वच्छतेसाठी तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. व्हिनेगर सहज मिळते. नसेल तर ते बाजारातून तुम्ही विकत घेऊ शकता. एका भांड्यात व्हिनेगर टाका. त्यानंतर वापरात नसलेल्या कापडाला त्यात बुडवा आणि भिजवून पिळून घ्या आणि त्याने भिंतीवरील डाग पुसा. व्हिनेगरने असे डाग काढण्यात मदत होऊ शकते.

३) बेकिंग सोडा

स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा देखील चांगला पर्याय आहे. बेकिंग सोडा किचनच्या टाइल्स स्वच्छ करण्यात मदत करू शकते. यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करा. आता त्यात डस्टिंगसाठी वापरात असलेले कापड भिजवून त्याने टाइल्स आणि भिती स्वच्छ करा. याने डाग काढण्यात मदत होऊ शकते.

(मुले बस, कारने शाळेत जातात? सुरक्षित प्रवासासाठी त्यांना द्या ‘या’ टीप्स)

४) लिंबू आणि सोडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहज न निघणारे डाग आणि चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबू हा सर्वात प्रभावी उपाय आहे. किचनच्या स्वच्छतेसाठी लिंबूचे रस काढा आणि त्याने छत आणि भिंती पुसा. त्यानंतर एका कापडाला सोडा मिसळलेल्या पाण्यामध्ये भिजवून त्याने पुसलेल्या ठिकाणी पुन्हा स्वच्छ करा. डाग मिटण्यात मदत होईल.