Tips while travelling during monsoon: जून-जुलैमध्ये ‘कोसळती जलधारा…’ सुरू झालं की सगळ्यांना वेध लागतात पावसाळी पिकनिकचे. धबधब्याचं ठिकाण, नदीकाठ, एखादा किल्ला किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे बेत नक्की होतात. अनेकदा अतिउत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना घडून जाते. याचं ताजंच उदाहरण म्हणजे, मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृ्त्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मुळात, निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचं हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठीच काही टिप्स…

निसरडे दगड, रस्ते यांच्यावर चालताना काळजी घ्या : धबधब्याच्या जवळचा भाग हा पाणी पडून किंवा शेवाळ आल्याने निसरडा होतो. अशा दगडांवरून किंवा रस्त्यांवरून चालल्यामुळे घसरून पडण्याची शक्यता असते. तेव्हा अशा रस्त्यावरून चालताना काळजी घ्यावी.

धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळावे : धबधबा हा उंच कड्यावरून कोसळत असल्याने त्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नाही. अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढतो त्यामुळे तेथून लगेच बाहेर पडता येत नाही आणि दुर्घटना होतात. त्यामुळे शक्यतो धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळावे.

‘रील्स’बघून पर्यटनाला जाऊ नका…

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ अन् एखाद्या पर्यटनस्थळाचे ‘रील्स’ बघून पावसाळी पर्यटनासाठी त्याठिकाणी जाण्याचा मोह आवरलेला नेहमीच चांगला. रील बघून एखादा गड, गिल्ला भ्रमंतीचा ‘प्लॅन’ जीवावर बेतणाराही ठरू शकतो. रील्समध्ये पुरेशी माहिती अजिबात नसते. रीलमध्ये व्ह्रूज मिळविण्यासाठी केलेली सुंदर फोटोग्राफी, प्रत्यक्षात ती जागा धोक्याची असू शकते. रील पाहून किल्ले चढायला जाणं तर टाळलेलंच बरं.

पावसाळी वातावरण सुखद असते; पण निसर्गाचां ऐकलंही पाहिजे. अचानक वाढणारा पाऊस, घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडी, धबधब्यांसह नदी- ओहोळांना अचानक वाढणारे पाणी, दाट धुके, ढगाळ हवामान अन् वृक्षराजींमुळे कमी होणारी दृश्यमानता, निसरड्या वाटा हे सारे काही नित्याचे नसते. शहरी माणसांना तर नसतेच नसते. स्थानिक लोक, वनविभागाचे कर्मचारी, पोलिस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा घातक ठरतं. एखादा धबधबा, आहोळ, गडाजवळ जाताना स्थानिक माणसं सूचना देतात. सल्ले देतात. याहून पुढे जाऊ नका म्हणतात तेव्हा ऐकायला हवं.

पावसाळी पर्यटनाला तुम्ही निघणार असाल तर सावध रहा. ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाचा भौगोलिक अभ्यास करुन तेथे संपर्क कुरुनच निघा. रस्यात कुठे दरड कोसळली असेल तर त्याचीही माहिती घ्या. नाहीतर तुमची मोठी अडचण होऊ शकते.

फिरायला गेल्यावर हे करा

अंगावर फुल टीशर्ट व फुलपँट असावी.

पायात रबर सोल असलेले बूट असावेत.

हातात एक छोटी चार फुटांपर्यंत काठी ठेवा.

धबधबा कोसळणाऱ्या ठिकाणी सतत पडणाऱ्या पाण्यामुळे कुंड तयार होतं. त्याची खोली लांब बांबू किंवा दोराला दगड बांधून मोजावी.

प्रथमोपचाराची बॅग जवळच ठेवा व त्यात आधार फळी व त्रिकोणी बँडेज जरूर ठेवा. फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीस बांधण्यास उपयोगी पडते.

फिरायला गेल्यावर हे अजिबात करू नका

उघड्यानं किंवा बनियान, हाफपँट घालू नये. कारण पाऊलवाटेवरील वनस्पतीशी संपर्क आल्यास किंवा जंगली कीडे चावल्यावर अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

अनवाणी किंवा स्लीपर्स घालून जाऊ नका. कारण दगडांवरून जर एखादा साप जाताना दिसला तर त्याला काठीने मारू नका. हाताने स्पर्श न करता, काठीनं त्याला वाटेतून दूर करा.

धो धो पाणी पडत असलेल्या ठिकाणी खाली बसू नका. कारण डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यातून धबधब्यात रूपांतर होते व त्या वाहणाऱ्या पाण्यातून एखादं झाड किंवा फांदी पाण्यातून वाहात येणारा दगड उंचावरून तुमच्या डोक्यात कोसळण्याची शक्यता असते.

पोहता येत नसेल तर गुडघ्यापर्यंत पाणी असलेल्या खोलीपर्यंतच जा. कारण पाण्याची भीती वाटत असेल तर पटकन बाहेर पडता येईल. कंबरेपर्यंत पाण्यात जाऊ नका. पाण्याचा प्रवाह जोरदार असेल तर पाणी तुम्हाला खेचून नेईल.

डोंगरावर असताना काळे ढग आले तर जास्त वेळ पाण्यात राहू नका. कारण डोंगरातील वरच्या भागात पाऊस पडला तर खालील भागात कुंडात किंवा नदीत पाण्याची पातळी व प्रवाह पटकन वाढू शकतो. लहान मुल किंवा ज्येष्ठ नागरिकांना एकटं सोडू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्गाच्या सहवासात असताना निसर्गाचे नियम जितके पाळाल तितके तुम्ही सुरक्षित असाल हे लक्षात ठेवा.