टॅटू ही संकल्पना भारतात काही नवीन नाही. अगदी गोंदणापासून ते कलरफुल इंक सह टॅटूचे अनेक प्रकार आजवर अपडेट झाले आहेत. शरीरभर टॅटू असो वा खांद्यावर, मनगटावर काढलेला एखादा छोटासा बिंदू एवढा टॅटू, या डिझाईनबद्दल अनेकांना उत्सुकता असते. तुम्हालाही जर टॅटू कूल वाटत असतील आणि तुम्हीही एखादी हटके डिझाईन शरीरावर काढून घ्यायचा विचार करत असाल तर थांबा. अलीकडेच वाराणसी मधुन समोर आलेल्या एका घटनेनंतर टॅटू काढण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. प्राप्त माहितीनुसार वाराणसी मधील दोघांना टॅटू काढल्यानंतर HIV ची लागण झाल्याचे समजत आहे. काय आहे हे प्रकरण सविस्तर पाहुयात..

TOI च्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये टॅटू काढल्यानंतर तब्बल १४ जणांची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे तर यातील दोन जणांना एचआयव्ही (HIV Positive) ची लागण झाली आहे. एकाच टॅटू पार्लर मधून टॅटू काढून घेतलेले हे १४ जण अचानक आजारी पडू लागले त्यामुळे त्यांना डॉक्टरांना काही टेस्ट करून घेण्यास सांगितले मात्र सर्व रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस डॉक्टरांनी त्यांना HIV चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आणि त्यातील दोघांचे रिपोर्ट्स चक्क पॉझिटिव्ह आले आहेत. टॅटू आर्टिस्टने कदाचित एकाच सुईचा वापर केल्याने हे संक्रमण झाल्याचे अंदाज आहेत.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

टॅटू काढताना या गोष्टी नक्की तपासून पहा

  • स्वस्तात किंवा मोठ्या डिस्काउंटच्या अपेक्षेत परवाना नसलेल्या टॅटू आर्टिस्ट कडून टॅटू काढून घेऊ नका.
  • टॅटू पार्लर मध्ये स्वच्छता बाळगली जात आहे का आहे सुनिश्चित करा
  • टॅटू काढताना वापरलेली शाई स्वच्छ असल्याची खात्री करा
  • टॅटू काढताना वापरण्यात येणारी सुई सुद्धा नीट स्वच्छ व किटाणूमुक्त केल्याचे तपासून पहा
  • टॅटू काढण्याआधी डॉक्टरांकडून स्किन तपासणी करून घ्या
  • जर तुमची त्वचा फार संवेदनशील असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टॅटू अजिबात काढू नका
  • टॅटू काढल्यावर आर्टिस्ट द्वारे त्वचेवर काय लावायचे याचे नियम सांगितले जातात, त्याचे पालन करा
  • जर कोणताही स्किनचा त्रास होत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.

(हे ही वाचा: Sex दरम्यान लिंगाला फ्रॅक्चर! Eggplant Deformity म्हणजे नेमकं काय व यामागची कारणं जाणून घ्या)

मायो क्लिनिकच्या माहितीनुसार टॅटू बनवताना जर आपल्या त्वचेवर अस्वच्छ सुईचा वापर केला गेला तर हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी असे ब्लड बॉर्न रोगही पसरू शकतात. तर काही वेळेस टॅटू काढताना त्वचेशी एमआरआय रिएक्शन होऊन त्वचेला सूज व जळजळ अशी समस्या सुद्धा उद्भवू शकते. यामुळे टॅटू काढताना वर दिलेल्या गोष्टी नक्की तपासून पहा.