Underwear Cleaning: शरीरातील सर्वात नाजूक भागाला ज्या कापडाचा थेट स्पर्श होतो त्याची स्वच्छता हा अत्यंत महत्त्वचा मुद्दा आहे. पण दुर्दैवाने अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आज आपण न लाजता या लेखातून तुमच्या मनातील काही प्रश्न सोडवून घेणार आहोत. तुम्हीही हे अनुभवले आहे का सांगा, तुम्ही छान कापडाच्या उत्तम अंडरवेअर बाजारातून घेऊन येता, एक दोन वेळा धुतल्यावर या अंडरवेअरच्या मधला भाग हा ब्लिच केलेल्या कापडाप्रमाणे दिसू लागतो. पांढरा- पिवळसर रंगाचा पट्टा या भागात दिसू लागतो. अनेकदा यात तुम्ही कपडे धुताना केलेल्या चुकाच कारण असू शकतात पण काही वेळा योनीतुन होणारा स्त्राव सुद्धा याला कारण ठरू शकतो.

डॉ चंद्रिका आनंद, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, फोर्टिस हॉस्पिटल्स यांच्या माहितीनुसार, “योनीतून स्त्राव होणे हे स्त्री शरीरातील एक सामान्य आणि निरोगी प्रक्रिया आहे आणि खरं तर, संसर्ग आणि इतर हानिकारक जीवांपासून योनी स्वच्छ करण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. परंतु, मासिक पाळी, हार्मोनल बदल आणि संक्रमण यांसारख्या घटकांवर अवलंबून योनीतून स्त्रावाचा पोत, सुसंगतता आणि रंग बदलू शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे,” .

प्रसूती-स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमिना खालिद यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, “अनेकदा तुमची पॅन्टी क्रॉचच्या भागात खराब होते . काळ्या किंवा गडद निळ्यासारख्या गडद-रंगाच्या अंडरवेअरमध्ये पांढरे किंवा पिवळसर पट्टे दिसू शकतात.”

अंडरवेअरच्या मधल्या भागाचा रंग का जातो?

डॉ आनंद यांच्या मते, निरोगी योनीचे नैसर्गिक पीएच मूल्य ३.८ आणि ४. ५ दरम्यान असते. “योनीमध्ये लैक्टोबॅसिली नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात, जे चांगले ऍसिडिक सत्व पातळी राखून खराब जीवाणूंचा संसर्ग पसरण्यापासून थांबवतात. जेव्हा तुम्ही ओव्ह्युलेशन काळात असता, तसेच गर्भधारणेदरम्यान योनीतून स्त्राव वाढतो. जेव्हा हा स्त्राव हवेच्या संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशनमुळे तुमच्या अंतर्वस्त्रावर पिवळा किंवा केशरी रंगाचा डाग पडू शकतो.”

ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने यावर तुम्हाला थेट उपाय करता येणे कठीण आहे मात्र तुम्ही काही गोष्टींची काळजी नक्कीच घेऊ शकता.

  • ज्या दिवशी योनीतून स्त्राव जास्त असावा हे तुम्हाला माहीत असेल त्या दिवशी हलक्या रंगाच्या पॅंटी निवडण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून ब्लीचिंग कमी दिसेल.
  • तुम्ही पॅन्टी लाइनर्स वापरू शकता जे स्त्राव शोषून घेतात आणि पॅन्टीला डाग पडण्यापासून रोखू शकतात.
  • शक्यतो सुती अंडरवेअर वापरण्याचा प्रयत्न करा, कारण ते ओलावा व संक्रमण टाळतात.

पण, तुम्हाला दुर्गंधी किंवा असामान्य रंग असा असामान्य स्त्राव दिसला तर, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉ रितू सेठी, संचालक, ऑरा स्पेशालिटी क्लिनिक, यांनी दिलेल्या माहितीनुसार, योनीतुन येणारा स्त्राव काय दर्शवतो हे पाहूया.

हे ही वाचा<< कलिंगडाच्या बिया चुकूनही फेकू नका, फायदे वाचून व्हाल थक्क! तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची भन्नाट पद्धत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • पिवळा किंवा हिरवा स्त्राव: हे बॅक्टेरियाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.
  • राखाडी डिस्चार्ज: हे देखील बॅक्टेरियल योनीसिसचे लक्षण असू शकते.
  • पांढरा स्त्राव: जाड, पांढरा, घट्ट स्त्राव हे यीस्ट संसर्गाचे लक्षण असू शकते.
  • तपकिरी किंवा लाल स्त्राव: हे मासिक पाळीत स्पॉटिंग किंवा रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते, परंतु ते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा एक्टोपिक गर्भधारणा यासारख्या गंभीर समस्यांचे सुद्धा लक्षण असू शकते.
  • फेसाळ स्त्राव: हे ट्रायकोमोनियासिसचे लक्षण असू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)