ऋतूंचे वेळापत्रक बिघडल्यामुळे कधीही थंडी वाजते आणि कधीही पाऊस पडत आहे. त्यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढण्याबरोबर त्वचेवरदेखील याचा परिणाम दिसून येतो. हवामानात बदल झाल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा सतत कोरडी होण्याची शक्यता असते. जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर काही घरगुती उपचार करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत हे घरगुती उपचार जाणून घ्या.

नारळाचे तेल
नारळाच्या तेलात इमॉलिएंट्स आढळतात. हे त्वचेला अधिक मऊ करण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर नारळाच्या तेलाने मसाज करू शकता.

मध
मध त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. मध त्वचेला मॉइश्चराईस करते. त्यामुळे जर त्वचा सतत कोरडी होत असेल तर चेहऱ्यावर १० मिनीटांसाठी मसाज करा. यामुळे फरक जाणवेल.

Face Bleach : घरी ब्लिच करताना ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; नक्की ठरतील फायदेशीर

पेट्रोलिअम जेल
पेट्रोलिअम जेल चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे त्वचेसाठी संरक्षण कवचाप्रमाणे काम करते. त्यामुळे चेहरा सतत कोरडा होत असेल तर त्यावर पेट्रोलिअम जेलने मसाज करा, यामुळे या समस्येपासून सुटका मिळेल.

बदामाचे तेल
बदामाच्या तेलात विटामिन इ असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रोज ५ मिनिटांसाठी बदामाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचा उजळते आणि कोरडी होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)