आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक स्त्रीचे याकडे विशेष लक्ष असते. पण कधीकधी कितीही स्वच्छता ठेवली तरी घरात झुरळ दिसतात, मान्सूनच्या वेळी तर अतिप्रमाणात झुरळ दिसून येतात. अशावेळी घरात झुरळांचा वावर वाढला तर ते फार किळसवाणे वाटते, मग लगेच बाजारात उपलब्ध असणारे केमिकल्स आणले जातात. पण हे केमिकल्स आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अशा केमिकल्स असणाऱ्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्याआधी भीती वाटते. कारण झुरळांचा मुख्य वावर स्वयंपाक घरात असतो आणि स्वयंपाक घरात अशा केमिकल्सचा वापर केल्यास खाद्यपदार्थांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. या समस्येवर सोप्पा उपाय उपलब्ध आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही अशा झुरळांच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत ते घरगुती उपाय जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठीचे घरगुती उपाय

आणखी वाचा : जास्त दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती; नक्की दिसेल फरक

कडुलिंब
कडुलिंबाच्या तीव्र वासाने झुरळांसह अनेक प्रकारचे कीटक घरापासून दूर ठेवण्यास मदत मिळते. यासाठी कडुलिंबाच्या तेलात कापूस बुडवून जिथे झुरळ दिसतील तिथे ठेवा. याशिवाय तुम्ही पाण्यात कडुलिंबाचे तेल किंवा त्याची पावडर मिसळून स्प्रे तयार करू शकता आणि जागोजागी हा स्प्रे शिंपडू शकता.

तमालपत्र
झुरळ घालवण्यासाठी तमालपत्र देखील मदत करू शकते. यासाठी तमालपत्र थोडे बारीक करून घ्या. त्याची फार बारीक पावडर न करता, फक्त ते हाताने थोडे बारीक करा. त्यांनंतर हे बारीक तुकडे त्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला अनेकदा झुरळं दिसतात. दुसरी पद्धत म्हणजे तमालपत्र पाण्यात उकळून ते पाणी स्प्रे बाटलीत भरून सर्वत्र शिंपडावे. यामुळे झुरळांची संख्या कमी होईल.

पेपरमिंट तेल
घरात असलेल्या झुरळांना मारण्यासाठी आणि त्यांची वाढ रोखण्यासाठी पेपरमिंट तेल खूप प्रभावी मानले जाते. यासाठी हे तेल पाण्यात मिसळून सर्व ठिकाणी शिंपडा. काही वेळातच त्याचा परिणाम दिसू लागेल.

आणखी वाचा : हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत काही बाबतीत गुणकारी ठरणारा कांदा खाल्ल्याने होऊ शकतात हे अपाय; लगेच जाणून घ्या

माउथवॉश
झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माउथवॉश हा देखील प्रभावी उपाय आहे. यासाठी माऊथवॉश आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि झुरळांच्या लपण्याच्या जागेवर हे मिश्रण शिंपडा.

कॉफी पावडर
कॉफी पावडरचा वास आणि त्यात असलेले कॅफिन हे दोन्ही झुरळांना मारण्यासाठी मदत करतात. यासाठी कॉफी पावडर कापडात गुंडाळून त्याचे छोटी पुडी बनवा. ही पुडी स्वयंपाकघर, बाथरूम, स्टोअर रूमच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे झुरळांच्या समस्येपासून सुटका मिळेल.

Health Tips : झोपण्याआधीच्या ‘या’ सवयी करतील निरोगी राहण्यास मदत

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use these home remedies to get rid of cockroaches pns
First published on: 20-09-2022 at 10:21 IST