How to Remove Kitchen Trolly: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून, तिचे स्वागत करण्यासाठी घरोघरी जोरदार तयारी सुरू आहे. प्रामुख्याने या दिवसांत लक्ष्मीदेवीची मनोभावे पूजा-अर्चना केली जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीचे स्वागत स्वच्छ व आनंदी वातावरणात करण्यासाठी घरोघरी या दिवसांत साफसफाई केली जाते. देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. त्यामुळे ज्या वास्तूत स्वच्छता असते, तिथे तिचा निवास असतो, असे म्हटले जाते.
दिवाळीच्या साफसफाईमध्ये घरातील स्वयंपाकघर साफ करणे खूप आव्हानात्मक काम आहे. कारण- स्वयंपाकघरातील फ्रिज, किचन ओटा, भांड्यांचे कपाट घासणे, किचन ट्रॉली साफ करणे याशिवाय घरातील सर्व भांडी घासावी लागतात. या सगळ्यात जर तुमच्या घरात किचन ट्रॉली असेल आणि ती जर तुम्हाला कधी काढताच येत नसेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी असा एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, ज्यात किचन ट्रॉली बाहेर काढून कशी साफ करायची हे कळेल.
किचन ट्रॉली ‘या’ पद्धतीने बाहेर काढा
या व्हिडीओमध्ये दिल्याप्रमाणे किचन ट्रॉलीच्या दोन्ही बाजूंना दोन क्लिप असतात, त्यातील एक क्लिप खाली जाते आणि दुसरी वर त्यामुळे त्याच पद्धतीने त्या प्रेस करा आणि बघा.
ट्रॉली अगदी सहज बाहेर येईल. त्यानंतर याच पद्धतीने तुम्ही इतर ट्रॉली रिकामी करून ती बाहेर काढा. ओल्या फडक्याने सर्व ट्रॉली स्वच्छ पुसून किंवा साबणाने घासून घ्या. ज्या ठिकाणी ट्रॉली लावली जाते, ती जागादेखील स्वच्छ करा. त्यानंतर ट्रॉली कोरडी झाल्यानंतर पुन्हा ती जागेवर लावून घ्या.
किचन ट्रॉली साफ करण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी
किचन ट्रॉली आतून अनेकदा खूप तेलकट, चिकट होतात. अशा वेळी त्या साफ करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा मीठ, बेकिंग सोडा, डिश वॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट स्क्रबरच्या साह्याने ट्रॉलीला लावा आणि स्वच्छ करा. त्यामुळे ट्रॉलीवरील चिकट घाण आणि गंजाचे डाग निघून जातील.
तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशही वापरू शकता. पण, ट्रॉली साफ करताना त्यात पाणी सांडणार नाही ना याची काळजी घ्या; अन्यथा संपूर्ण ट्रॉली गंजण्याची शक्यता आहे. अशा वेळी ट्रॉली स्वच्छ करून झाल्यानंतर कॉटनच्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसा.
पाहा व्हिडीओ:
‘या’ गोष्टींची घ्या काळजी
- ट्रॉलीमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका.
- ट्रॉली ओल्या कापडाने पुसल्यानंतर सुकण्यासाठी ती उघडी करून ठेवा. ट्रॉलीतील कप्पे बाहेर निघणारे असतील, तर तुम्ही एकेक कप्पा बाहेर काढून स्वच्छ करा.
- दमट वातावरणात दररोज ट्रॉली कोरड्या कापड्याने स्वच्छ करा.