Vastu Tips For Kitchen : घर बांधताना आपण टाइल्सच्या नवीन डिझाइन, भिंती रंगविण्यासाठी चांगले रंग आणि इतर सजावट म्हणून अनेक गोष्टी खरेदी करतो. काही लोक फक्त इथवरच थांबत नाही, ते आपलं घर वास्तुशास्त्रातील नियमानुसार असावं यासाठीही प्रयत्न करतात. मग घरातील बेडरूमपासून लिव्हिंग एरिया आणि पुढे पूजेची खोली सर्व काही योग्य दिशांना बांधण्याचा प्रयत्न करतात. पण, यादरम्यान अनेक जण किचन नेमकं कोणत्या दिशेनं असावं याकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण, जर तुम्ही वास्तुशास्त्रातील नियमानुसार किचन बांधलंत, तर त्यामुळे घरात केवळ सकारात्मक वातावरणच राहणार नाही, तर तुमच्या आयुष्यातही अनेक बदल होतील. त्यामुळे घर बांधताना किचन कोणत्या दिशेनं बांधावं काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ….
१) स्टोव्ह आणि गॅस बर्नरची दिशा
जेव्हा तुम्ही किचनमध्ये स्टोव्ह किंवा गॅस बर्नर ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा की, त्याची दिशा कधीही मुख्य दरवाजासमोर नसावी. तो भिंतीपासून काही इंच अंतरावर ठेवा.
२) किचनचा दरवाजा
किचन बांधताना त्याचं दार कोणत्या दिशेनं असावं याचीही विशेष काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रातील नियमानुसार, स्वयंपाकघराचं दार कोणत्याही कोपऱ्यात नसावं, जर दाराची दिशा पूर्व, उत्तर किंवा पश्चिमेकडे असेल, तर ते खूप चांगलं असतं.
३) जेवण बनवताना करा ‘हे’ काम
तुम्ही किचनमध्ये जेवण बनवल्यानंतर ते खाण्यापूर्वी अग्नी देवतेच्या नावानं थोडासा भाग बाजूला ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी येईल. मग त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी आणि सुखी राहाल.
४) झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम
जेवल्यानंतर किचन पूर्णपणे स्वच्छ करा, वापरलेली भांडी उद्या घासण्यासाठी ठेवू नका. झोपण्यापूर्वी सर्व भांडी स्वच्छ करा. कारण- खरकटी भांडी किचनमध्ये ठेवल्यानं नकारात्मक वातावरण निर्माण होतं.