गेल्या काही दिवसात टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक इतर कंपन्यांच्या प्लानशी तुलना करत नंबर पोर्ट करत आहेत. त्यामुळे आपले ग्राहक कमी होऊ नये, यासाठी आकर्षक प्लान ग्राहकांना ऑफर करत आहेत. व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लान आणले आहेत. १५५ रुपये, २३९ रुपये, ६६६ रुपये आणि ६९९ रुपयांचा प्लान आहे. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्ससह अनेक फायदे मिळतात.
प्लान सुविधा १५५ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. मोफत एसएमएस सेवा नाही. २४ दिवसांचा कालावधी आहे. २३९ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. २४ दिवसांचा कालावधी आहे. ६६६ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १.५ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ७७ दिवसांचा कालावधी आहे. ६६९ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण ३ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ५६ दिवसांचा कालावधी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2021 रोजी प्रकाशित
Vodafone Idea: Vi नेटवर्क कंपनीने ग्राहकांसाठी आणले ४ स्वस्त प्रीपेड प्लान; वाचा
आपले ग्राहक कमी होऊ नये, यासाठी आकर्षक प्लान ग्राहकांना ऑफर करत आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-12-2021 at 15:25 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vi network company 4 cheap prepaid plans for customers rmt