How To Reduce Burning After Cutting Chilies: मिरचीच्या बियांमध्ये आणि बाजूच्या थरांमध्ये अल्कलॉइड ऑइल कॅप्सेसिनमुळे तिखटपणा येतो. या घटकांना स्पर्श झाल्यास त्या अवयवाची जळजळ होऊ शकते. अनेकजण बरं वाटावं म्हणून मिरची कापून झाली की पाण्याखाली हात धरतात पण यामुळे ते तिखट तेल आणखी पसरत जाते. अशावेळी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मिरची कापताना नेहमी ग्लोव्ह्ज घालणे हा एक चांगला नियम आहे, ग्लोव्ह्ज घालणे शक्य नसेल तर आपण हाताला निदान तेल लावावे जेणेकरून मिरचीचा तिखट थर हातावर टिकणार नाही. समजा तरी तुमच्याकडून अनावधानाने चूक झालीस तर हाताची जळजळ घालवण्यासाठी काही सोपे उपाय आपण आज पाहुयात.. दूध दुधामुळे मिरचीचा तिखटपणा निघून जाण्यास मदत होते, त्यामुळेच समजा तुम्हाला तिखट खाल्ल्याने जिभेची जळजळ होत असेल तरी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हाताचा जाळ होत असल्यास वाडग्यात दुध घेऊन त्यात हात बुडवून ठेवा. थंड दूध घेतल्यास अधिक परिणामकारक ठरू शकतो.हाताला थंडावा जाणवला की थोड्यावेळाने थंड पाण्याने हात धुवून घ्या. याशिवाय आपण घट्ट दही सुद्धा लावून दाह थांबवू शकता. तेल शक्यतो मिरची चिरण्याआधीच हाताला थोडे तेल लावणे फायद्याचे ठरते पण असं न केल्यास आपण मिरची चिरून झाल्यावर हाताला राईचे तेल लावू शकता. मिरचीचा तिखटपणा पाण्यापेक्षा तेलांमध्ये जास्त विरघळतो त्यामुळे दाह दूर होण्यास मदत होते. डिश वॉशिंग लिक्विड भांडी घासायचे लिक्विड हे तिखटपणा व दाह दूर करण्यासाठी चटकन परिणामकारक ठरते. अनेकांना यामुळे मदत झाली आहे. पण शक्यतो हे लिक्विड वापरून हात धुतल्यावर हाताला नीट मॉइश्चरायजर लावायला विसरु नका. बेकिंग सोडा बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिसळून एक पेस्ट बनवा जी आपल्याला हाताला लावायची आहे. पेस्ट जशी सुकायला लागेल तसा दाह कमी होण्यास मदत होईल. स्टेनलेस स्टील अनेक स्मार्ट गृहिणी सांगतात की, की जर तुम्ही स्टेनलेस स्टीलवर हात घासलात तर कांदा आणि लसूण सारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थांचा वास निघून जाईल. त्याच प्रकारे, स्टेनलेस स्टीलमध्ये वेदनादायक दाह दूर करण्यासही मदत करू शकतो. स्टेनलेस स्टीलचे ताट किंवा वाटी फ्रीजमध्ये ठेवून मग हातावर फिरवल्यास दाह निवळण्यास मदत होते. हे ही वाचा<< Video: सिलेंडर अचानक संपला की गोंधळून जाऊ नका! न घाबरता नवीन सिलेंडर जोडायच्या ‘या’ स्टेप्स पाहा मिरची कापल्यावर हाताची जळजळ कशी घालवाल? हे ही वाचा<< Video: भाताचा लगदाही नको,कच्चाही नको! मोकळा फडफडीत भात बनवायच्या ‘या’ १० बेस्ट टिप्स पाहा तुमच्याकडेही अशाच काही सोप्या स्मार्ट टिप्स असतील तर कमेंट करून नक्की कळवा!