scorecardresearch

आरोग्यासाठी गुणकारी आहे अक्रोड, शरीरासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘या’ पदार्थाला ठेवतो नियंत्रणात

शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. अक्रोडचे सेवन केल्याने ते नियंत्रणात येण्यात मदत होऊ शकते.

walnut benefits, uric acid and walnut
वॉलनटचे फायदे

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मात्र, धावपळीच्या जीवनामुळे लोकांचे योग्य आहाराकडे दुर्लक्ष होत चालले आहे. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे वाढणे देखील त्याचेच परिणाम आहे. युरिक अ‍ॅसिडचे वाढणे हे खराब आहाराचा परिणाम आहे. युरिक अ‍ॅसिड हे शरीरातील विषारी पदार्थ आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते आणि मुत्रपिंड त्यास फिल्टर करून शरीरातून सहजपणे काढून टाकते. युरिक अ‍ॅसिडचे तयार होणे ही समस्या नाही, परंतु, जेव्हा मुत्रपिंड ते फिल्टर करून त्यास शरीरातून काढून टाकत नाही, तेव्हा ते आजाराचे कारण ठरू शकते. मात्र, अक्रोडचे सेवन केल्याने ते नियंत्रणात येण्यात मदत होऊ शकते.

या कारणांमुळे वाढते युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण

आहारात प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन, दारूचे सेवन, अनुवांशिक समस्या, हायपोथायरॉईडीझम, किडनीच्या समस्या यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. जसजसे युरिक अ‍ॅसिड तयार होते, ते सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरुपात जमा होऊ लागते, ज्यामुळे गाउट होतो. युरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम पायांवर दिसून येतो. पायाच्या बोटात असह्य वेदना होतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे पाय दुखणे, सूज येणे, सांधेदुखी होते.

(Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या)

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे काही पदार्थ आहेत जे युरिक अ‍ॅसिड लवकर नियंत्रित करतात. अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे जे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यात खूप प्रभावी ठरते. ज्या लोकांचे युरिक अ‍ॅसिड जास्त राहते त्यांनी रोज अक्रोडाचे सेवन करावे.

अक्रोडद्वारे असे नियंत्रित होते युरिक अ‍ॅसिड

अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. त्याच बरोबर ते अँटी इन्फ्लेमेटेरी गुणांनी युक्त असून त्यात विटामिन बी ६, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व देखील आहेत. हे पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवतात. अक्रोडातील प्रथिने गाउट रोगावर उपचार करतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. अक्रोड खाल्ल्याने सांध्यांमध्ये जमा झालेले क्रिस्टल्स लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात.

(मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी काही स्वादिष्ट पण तितकेच पौष्टीक पदार्थ कोणते आहेत जाणून घ्या…)

अक्रोडचे इतर फायदे

अक्रोड हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. अक्रोडमध्ये हेल्दी फॅट, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, कॉपर, सेलेनियम, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले अक्रोड रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि रोगांपासून संरक्षण करते. फायबरने समृद्ध अक्रोड बद्धकोष्ठतेपासून आराम देते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहाते. अक्रोड खाल्ल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. लठ्ठपणामुळे त्रासलेल्या लोकांनी आहारात अक्रोडचे सेवन करावे याने चरबी झपाट्याने कमी होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-09-2022 at 18:33 IST
ताज्या बातम्या