Reverse Diet For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आजवर अनेक फंडे आपण वापरून पाहिले असतील. बहुतांश डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. अचानक शरीराला कमी आहार दिल्याने चिडचिड होणे स्वाभाविक आहे. पण तुम्हाला माहित आहे का सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच डाएट प्लॅन व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क आपल्याला वजन कमी करण्यासाठी अधिक खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय व त्यावर डॉक्टरांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे हे ही पाहुया…

ही डायटिंग पद्धत काय आहे? (What Is Reverse Diet)

अधिक खाणे म्हणजे एकाच वेळी भरपूर प्रमाणात खाणे असे नाही. फोर्टिस हॉस्पिटल अँड किडनी इन्स्टिट्यूट, कोलकाता येथील सल्लागार आहारतज्ञ सोहिनी बॅनर्जी यांनी सांगितले की, “रिव्हर्स डाएटचे उद्दिष्ट हे आहे की डाएटिंग थांबवल्यावर आपले वजन पुन्हा वेगाने वाढू नये. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पोटात कितीही कॅलरी ढकलायला हव्यात.”

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई

शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव म्हणाले की, रिव्हर्स डाएटिंगची कल्पना अ‍ॅडॉप्टिव्ह थर्मोजेनेसिस (चयापचय अनुकूलन) भोवती फिरते, जी एक संरक्षणात्मक प्रक्रिया आहे जी शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

रिव्हर्स डाएटमुळे शरीरात काय बदल होतात? (How Reverse Diet Changes Body)

१) भूक वाढवण्यासाठी विविध हार्मोन्स शरीरात सोडले जातात यामुळे शरीरच तुम्हाला अधिक खाण्यास प्रवृत्त करते.
२) रेस्ट मेटाबॉलिज्म रेट (RMR) मध्ये घट
३) एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस (EAT) मध्ये घट
४) विना-व्यायाम ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस (NEAT) मध्ये घट.
५) पचनाचा वेग: कॅलरी नियंत्रण करताना, शरीर शक्य तितक्या पोषक कॅलरी शोषण्यासाठी पचनाचा वेग कमी करू शकते. याउलट कॅलरी अधिक खाल्ल्यास मेटाबॉलिज्म दर वाढू शकतो.

रिव्हर्स डाएटचे फायदे (Reverse Diet Benefits)

१) सतत भूक लागल्यासारखे वाटत नाही.
२) कॅलरी नियंत्रणासाठी जर आपण सतत कमी खात असाल तर यामुळे काही वेळा आपल्याला सुस्ती, थकवा आणि चिडचिड वाटू शकते.
३) अनेकजण काही दिवसांसाठी डाएट फॉलो करून मग पुन्हा आपल्या जुन्या खाण्याच्या सवयींकडे वळतात यामुळे पुन्हा वजन वाढू शकते यापेक्षा तुम्ही रिव्हर्स डाएटिंगने वजन प्रमाणात व मंद गतीने पण दीर्घकालीन कमी करू शकता.
४) रिव्हर्स डाएटिंग अंतर्गत येणारा आहार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार, हृदयाचे आरोग्य, आतडे कार्यक्षमता, पुनर्प्राप्ती, मानसिक आरोग्य आणि शरीराची रचना यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
५) पचनप्रक्रिया बहुतअंश कॅलरीज वापरात असल्याने अनावश्यक फॅट्स शरीरात जमा होऊन पडत नाहीत.

रिव्हर्स डाएट करण्याची गरज कोणाला? (Who Needs Reverse Diet)

जे त्यांच्या सध्याच्या डाएटमध्ये ८० टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीचे सेवन करतात त्यांना वजनानुसार आवश्यक कॅलरीचे प्रमाण घ्यायला हवे. रिव्हर्स डाएटिंग प्रत्येकासाठी वेगवेगळे दिसेल, परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठत नाही तोपर्यंत साधारणतः ४-१० आठवड्यांपर्यंत दर आठवड्याला ५० -१५० डेली कॅलरी जोडणे समाविष्ट असते.

हे ही वाचा<< जास्त पाणी प्यायल्यास महिन्याभरात वजन झटपट कमी होते? तज्ज्ञांनी सांगितले योग्य प्रमाण व पद्धत

रिव्हर्स डाएट करताना काय लक्षात ठेवावे?

या संपूर्ण आहार पद्धती दरम्यान कार्डिओ व्यायाम करत राहावे, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले. “रिव्हर्स डाएट करताना भूक लागणे सामान्य आहे जे खरे तर तुमचे मेटाबॉलिज्म वेगवान होत असल्याचे लक्षण आहे. पण या कॅलरीज बर्न करण्यासाठी शारीरिक व्यायामाची जोड देणे सुद्धा आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)