Navaratri Festival: नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वांत आनंदी आणि उत्साहपूर्ण सणांपैकी एक आहे. देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे पूजन करून हा सण साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रात लोक रंगीत कपड्यांमध्ये सजतात आणि गरबा-डांडिया साजरा करतात. सणात रंग आणि उत्साह असतो, म्हणून नऊ दिवस नऊ रंग या थीममध्ये आपल्या ड्रेसिंगला स्टायलिश आणि धार्मिक असा दोन्ही प्रकारे अर्थ देता येतो.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसानुसार ठरलेले रंग कोणते?

पहिला दिवस – पांढरा
दुसरा दिवस – लाल
तिसरा दिवस – पिवळा
चौथा दिवस – राखाडी
पाचवा दिवस – मोरपंखी
सहावा दिवस – रॉयल निळा
सातवा दिवस – हिरवा
आठवा दिवस – केशरी
नववा दिवस – गुलाबी
 
प्रत्येक दिवशी कोणता रंग आणि कसा लूक कराल?

पहिल्या दिवशी – पांढरा रंग हा शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पांढरी अनारकली, साधी कॉटन साडी किंवा कुर्ती घातली, तर छान दिसेल. पांढऱ्या रंगाला निळ्या किंवा लाल रंगाची जोड दिल्यास पेहराव अधिक उठून दिसेल. तसेच चंदेरी दागिने, पांढरी टिकली आणि हलका मेकअप यांमुळे लूक अजून सुंदर होईल. जर त्याशिवाय वेगळ्या प्रकारे वेअर करायचे असेल, तर पांढऱ्या स्कर्टवर रॉयल निळा किंवा लाल टॉप खूप आकर्षक दिसेल; तर पांढरा टॉप घालून गुलाबी किंवा डेनिम स्कर्ट घातल्यास एलिगंट लूक येईल. चंदेरी दागिन्यांमुळे हा लूक अधिक खुलेल.

दुसऱ्या दिवशी – लाल रंग हा शक्ती, सामर्थ्य व प्रेमाचे प्रतीक आहे. लाल रंगाचा लेहंगा, चोली, साडी किंवा गाऊन अशी वेशभूषा या दिवशी खास शोभून दिसते. लाल रंगासोबत काळा किंवा सोनेरी असा रंगमिलाफ सर्वांत आकर्षक वाटतो. गोल्डन नेकलेस, लाल बांगड्या व छोटीशी टिकली याने लूक पूर्ण होतो किंवा लाल स्कर्टसोबत काळा किंवा गोल्डन टॉप अप्रतिम दिसले. लाल टॉपसोबत पांढरा किंवा रॉयल निळा स्कर्ट घातल्यास लूक पारंपरिक आणि आधुनिक असा दुहेरी वाटेल. गोल्डन हूप्स व बांगड्या या पेहरावावर अजून आकर्षक वाटतील.

तिसऱ्या दिवशी – पिवळा रंग हा आनंद, ऊर्जा व सकारात्मकतेचे प्रतीक आहे. पिवळा चिकनकारी ड्रेस, कुर्ती किंवा साडी घातल्यास फ्रेश लूक येतो. पिवळा स्कर्ट हिरव्या किंवा पांढऱ्या टॉपसोबत उठून दिसेल. पिवळा टॉप घालून ब्लॅक किंवा ऑरेंज स्कर्ट घातल्यास मॉडर्न लूक येईल. गोल्डन इयररिंग्स व रंगीबेरंगी बांगड्या छान शोभून दिसतील. पिवळ्या रंगाशु हिरवा किंवा लाल रंगाची जोड दिल्यास पेहराव अधिक खुलतो.

चौथ्या दिवशी – राखाडी रंग हा स्थिरता व संतुलनाचे प्रतीक आहे. राखाडी रंगाची कुर्ती, साडी किंवा वेस्टर्न गाऊन घातल्यास एलिगंट लूक येईल. या रंगाला गुलाबी किंवा लाल रंगाची जोड दिल्यास पोशाखात आकर्षकपणा दिसून येईल. राखाडी स्कर्टसोबत पांढरा किंवा गुलाबी टॉप किंवा राखाडी टॉप घालून लाल किंवा ब्लॅक स्कर्ट घातल्यास पेहराव उठून दिसेल. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि ब्लॅक बेल्टसोबत हा लूक आकर्षक वाटेल.

पाचव्या दिवशी – मोरपंखी रंग हा पुन्हा एकदा येतो, तोही ताजेपणा व निसर्गाचे प्रतीक आहे. हिरव्या रंगाची कॉटन साडी किंवा ड्रेसने या दिवशी तुमचा एक वेगळा लूक दिसेल. हिरवा रंग पिवळ्या किंवा लालसोबत जोडल्यास खूप खुलतो. गोल्डन दागिने किंवा साधी सिल्व्हर अ‍ॅक्सेसरीज या रंगावर शोभून दिसते.

सहाव्या दिवशी – रॉयल निळा रंग राजेशाही व आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. रॉयल निळा स्कर्ट पांढऱ्या किंवा सिल्व्हर टॉपसोबत खास उठून दिसेल किंवा निळा टॉप घालेन पिवळा किंवा पेस्टल पिंक स्कर्ट घातला तरी तो उठून दिसेल. सिल्व्हर अ‍ॅक्सेसरीज आणि मेटॅलिक पर्सने हा पेहराव पूर्ण होतो. या रंगाची साडी, गाऊन किंवा कुर्ती घातल्यास लूक अत्यंत उठावदार दिसतो. निळ्या रंगाला सिल्व्हर किंवा गुलाबी रंगाची जोड दिल्यास तो अधिकच आकर्षक होतो. सिल्व्हर दागिने, मेटॅलिक बॅग आणि हाय हील्स या रंगावर छान शोभतात.

सातव्या दिवशी – हिरवा रंग हा समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. हिरव्या रंगाचा शरारा, लेहेंगा किंवा साधी कुर्ती या दिवशी खूप छान दिसेल. त्याचबरोबर हिरव्या रंगाला गोल्डन किंवा पिवळ्या रंगाची जोड दिल्यास पारंपरिक लूक येईल. गोल्डन दागिने, गजरा आणि मॅचिंग पर्स या रंगावर शोभेल .

आठव्या दिवशी – केशरी हा रंग उत्साह, उर्जा व आनंदाचे प्रतीक आहे. नारिंगी रंगाची कुर्ती-प्लाझो किंवा प्रिंटेड ड्रेस या दिवशी उठून दिसेल. नारिंगी रंगाला पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाची कॉम्बिनेशन दिल्यास लूक अजून सुंदर होईल. गोल्डन इयररिंग्स, बांगड्या व साधी टिकली लूकला पूर्ण करते. नारिंगी स्कर्ट पांढऱ्या किंवा गोल्डन टॉपसोबत सुंदर दिसेल. नारिंगी टॉपवर डेनिम किंवा ऑफ-व्हाईट स्कर्ट घेतल्यास ट्रेंडी कॉम्बो तयार होतो. गोल्डन ज्वेलरी आणि पांढरे शूज या लूकला वेगळा लूक देतात.

नवव्या दिवशी – गुलाबी रंग हा प्रेम, कोमलता व आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंगाची अनारकली, साडी किंवा गाऊन यांमुळे आकर्षक लूक मिळेल. गुलाबी रंगाला पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाची जोड दिल्यास सौंदर्य खुलून दिसेल. मोत्याचे दागिने, हलके ब्रेसलेट आणि पिंक शेड लिपस्टिक या रंगासोबत यांमुळे तुम्ही उठून दिसाल.