गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर अनेकजण करतात. मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांनाही साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलानुसार गूळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे हिवाळ्यात दररोज किमान एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात गूळ खाणे कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे:

आणखी वाचा: चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम

रक्ताभिसरण व्यवस्थित होते
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. गुळात आढळणारे लोह रक्ताभिसरणाची गती वाढवते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

छाती जड होण्याच्या समस्येवर उपाय
दमा, ब्राँकायटिसचा त्रास असणाऱ्यांना हिवाळ्यात छाती जड होण्याचा त्रास वाढू शकतो. अशात गूळ खाणे हा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. गुळामध्ये अंतीबॅक्टरियल आणि अँटी इम्प्लॉयमेंटरी गुणधर्म आढळतात जे फुफुसांमधील सूज कमी करून, त्यामध्ये जाणवणारा जडपणा कमी करण्यास मदत करतात.

सतत पोटात होणाऱ्या गॅसवर ठरते फायदेशीर
गूळ खाल्ल्याने पोटातील अ‍ॅसिडीक पीएच योग्य राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे अ‍ॅसिडीटी आणि पोटात सतत होणाऱ्या गॅसपासून सुटका मिळण्यास मदत होते. अ‍ॅसिडीटी झाल्यास पाण्यात गूळ टाकून ते पाणी प्या, यामुळे अ‍ॅसिडीटीपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. यासह पोट फुगण्याच्या समस्येवरही गूळ खाणे फायदेशीर मानले जाते.

आणखी वाचा: घरी दही बनवताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स; गोड व घट्ट दही बनवण्यासाठी नक्की करतील मदत

गूळ खाण्याची योग्य वेळ
दुपारी जेवणानंतर गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि पोटाचे विकारही टाळता येतात. तसेच यामुळे अन्नपचन होण्यास मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the health benefits of eating jaggery in winter know its effects on body pns
First published on: 14-12-2022 at 11:44 IST