चहा हे भारतीयांचे आवडते पेयं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून दिवभरातील कामांमधील ब्रेकमध्ये अनेकवेळा चहा पिण्याची सवय अनेकांना असते. काहींना तर जेवल्यानंतरही चहा पिण्याची सवय असते. तर अशाप्रकारे सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी कितीही वेळा चहा पिण्याची सवय अनेकांना असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तणाव कमी करणारा चहा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे याचे अति सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. यासह अनेकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चहा पिऊन लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी कसे धोकादायक ठरते जाणून घ्या.

आणखी वाचा: ‘या’ आजारांमध्ये आले खाणे ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय समस्या उद्भवतात जाणून घ्या

पोटाचे विकार
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळे पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.

दातांच्या समस्या उद्भवू शकतात
गरम चहा प्यायला नंतर त्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने तोंडातील तापमानात होणाऱ्या या अचानक बदलामुळे दातांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे दातांच्या नसांमध्ये तसेच हिरडयांमध्ये वेदना जाणवू शकतात.

आणखी वाचा: ‘या’ आजरांमध्ये कोबी खाणे ठरते फायदेशीर; लगेच जाणून घ्या

सर्दी, खोकला
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. तसेच यामुळे घशात वेदना होणे किंवा त्याबाबतच्या समस्या उद्भवू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never drink water after tea this can be dangerous for health know its serious side effects pns
First published on: 13-12-2022 at 14:00 IST