Which Water Bottle Is Best To Use Every Day : फिरायला जाताना किंवा ऑफिसला जाताना सुद्धा आपल्या बॅगेत एक पाण्याची बाटली असतेच. आजकाल बाजारात अनेक फॅन्सी बाटली उपलब्ध असतात.पण, पाण्याची बाटली तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतात याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही… तर जिमपासून ते अगदी रात्री झोपताना बेडच्या बाजूला टेबलवर आपण एकतरी पाण्याची बाटली ठेवतो. पण, सगळ्याच पाण्याच्या बाटल्या एकसारख्या बनवल्या जात नाही.

तर प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य समर्थक डॉक्टर मनन व्होरा यांनी अलीकडेच एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये घरगुती पाण्याच्या बाटल्यांची क्रमवारी लावली आहे.

कोणती बाटली दररोज वापरण्यासाठी चांगली आहे (Which Water Bottle Is Best To Use Every Day)

१. स्टीलची बाटली

स्टेनलेस स्टीलची बाटली टिकाऊ असते आणि बीपीए किंवा थॅलेट्स सारख्या हानिकारक रसायनांपासून मुक्त असतात. आपण या बाटलीमध्ये गरम चहा, थंड पाणी भरून ठेवतो. या बाटल्या तापमान उत्तम प्रकारे राखून ठेवतात आणि विषारी पदार्थ बाहेर येऊ देत नाही; त्यामुळे दररोज वापरण्यासाठी स्टीलची बाटली उत्तम आहे.

स्टीलची बाटली वापरण्याचे फायदे आणि तोटे

फायदे – अत्यंत टिकाऊ, विषारी पदार्थ किंवा वास नसतो. तासंतास द्रव पदार्थ गरम आणि थंड ठेवतात.
तोटे: स्टीलची बाटली प्लास्टिकपेक्षा थोडी जड आणि महाग सुद्धा आहे.

२. काचेची बाटली (Glass Bottle)

काचेची बाटली शुद्ध चवीचे पाणी . काचेच्या बाटल्यात पाण्याची चव शुद्ध असते. तसेच या बटाळूया पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि पुनर्वापर करण्यायोग्य असतात. पण, फक्त या नाजूक असतात.

काचेची बाटली वापरण्याचे फायदे आणि तोटे

फायदे: काचेची बाटली नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्यामुळे अशा बाटलीतून प्यायल्यावर तोंडात कुठलाही उग्रपणा, रासायनिक चव किंवा अजीब वास राहत नाही. तसेच काचेची बाटली पुनर्वापर करण्यायोग्य आहे.
तोटे: काचेची बाटली नाजूक आणि जड असू शकते. त्यामुळे बाटली फुटण्याची शक्यता जास्त असते.

३. तांब्याची बाटली (Copper Bottle)

तांब्याची बाटली पारंपारिक असली तरीही नेहमीच वापरता येणार नाही. रात्रभर तांब्याच्या बाटलीत पाणी साठवल्याने त्यात आरोग्यदायी आयनचा समावेश होतो असे मानले जाते. पण, सतत तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे हा सर्वोत्तम पर्याय नाही, कारण ते प्रतिक्रियाशील बनू शकते.

तांब्याची बाटली वापरण्याचे फायदे आणि तोटे

फायदे: रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, बाटलीचे आकर्षण वाढवते.
तोटे: दिवसभर वापरण्यासाठी योग्य नाही. ऑक्सिडेशन टाळण्यासाठी काळजीपूर्वक साफसफाई करणे आवश्यक आहे.

४. सीपर बाटली (Sipper Bottle)

सोयीस्कर, वर्कआउट-फ्रेंडली बाटली जास्तकरून जिममध्ये वापरण्यासाठी बेस्ट आहे. पण, या बाटल्या वारंवार स्वच्छ केल्या नाहीत तर त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ शकतात.

सीपर बाटली वापरण्याचे फायदे आणि तोटे

फायदे: फिरताना पिण्यास सोपे आणि बॅगेतून घेऊन जाण्यासाठी हलके आहे.
तोटे: व्यवस्थित स्वच्छ करणे कठीण ठरते आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त उद्भवतो.
निर्णय: व्यायामासाठी वापरा आणि नियमितपणे घासा. वास येऊ लागला की बाटली लगेच बदला.

५. प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर (Reused Plastic Bottles)

बिस्लेरी किंवा मिनरल कंपनीच्या बाटल्या पुन्हा वापरणे टाळा. कारण – कालांतराने या बाटल्या खराब होतात आणि बाटलीत मायक्रोप्लास्टिक्स आणि संभाव्य हानिकारक रसायने जमा होतात. एकदा वापरता येणारे प्लास्टिक कधीही वारंवार वापरू नका.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचे फायदे आणि तोटे

फायदे: सहज उपलब्ध होतात.
तोटे: कालांतराने मायक्रोप्लास्टिक्स सोडतात, वारंवार वापरण्यासाठी डिझाइन केलेल्या नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता ही माहिती वाचून कोणती बाटली तुम्ही शाळा, कॉलेज आणि ऑफिसला घेऊन जाऊ शकता हे ठरवा आणि त्याचा उपयोग करा.