उत्तम आरोग्यासाठी नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबुत व्हावी यासाठी त्यांनी दररोज किमान एक क्लास दूध पिण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे आढळतात. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण आरोग्यासाठी गाईचे दूध जास्त फायदेशीर असते की म्हशीचे याबाबत अनेक जणांना शंका असते. गाईचे दूध उत्तम की म्हशीचे याबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : तळलेले पदार्थ बनवताना तब्येतीची काळजी वाटते; ‘या’ ट्रिक्स वापरून जेवण बनवा आणि चिंता दूर करा

गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधातील फरक

  • गाईचे दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असते. गाईच्या दुधात ३ ते ४ टक्के फॅट असते, तर म्हशीच्या दुधात ७ ते ८ टक्के फॅट असते.
  • गाईच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण कमी असते, तर म्हशीच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
  • म्हशीच्या दुधात जास्त कॅलरीज असतात, तर गाईच्या दुधात कमी कॅलरीज असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गाईचे दूध प्यावे.
  • गाईचे दूध पातळ असते. त्यात ९० टक्के पाणी असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. याउलट म्हशीचे दूध घट्ट असते आणि पचायला जड असते.
  • गाईच्या दुधात कोलेस्ट्रॉल जास्त असते, तर म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते. त्यामुळे हायपरटेन्शन आणि किडनीच्या रुग्णांना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
  • दुधात अनेक पोषकतत्वे आढळतात त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार कोणते दूध प्यायचे हे ठरवावे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which milk is best for health cow milk or buffalo milk pns
First published on: 12-09-2022 at 14:57 IST