आचार्य चाणक्य यांनी पहिला मौर्य सम्राट चंद्रगुप्त यांना सत्तेवर येण्यास मदत केली. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना दिले जाते. आचार्य चाणक्य यांनी सम्राट चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार या दोघांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले.

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार होते. त्यांची पारंपारिकपणे ओळख कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून केली जाते, ज्यांनी अर्थशास्त्र हा प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ अंदाजे तिसर्‍या शतकाच्या दरम्यानचा आहे.

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रिभरणेन ग ।
दुःखितैः संप्रयागेन पंडितो-प्यन्वसिदति ।

पहिला अध्याय मधील चतुर्थ श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ज्या व्यक्ति आयुष्यात व्यवहारामध्ये दु:खी असतात अशा लोकांशी व्यवहार करून ज्यांची संपत्ती नष्ट झाली आहे, अशा व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे ज्ञानी माणसासाठी हानिकारक ठरू शकते.

ज्या घरात दुष्ट स्त्रिया असतात, त्या गृहस्थाची स्थिती अत्यंत बिकट बनलेली असते, कारण त्याच्यावर प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण असते आणि अशा व्यक्ति मनातून खूप खचत जातात. याचबरोबर वाईट स्वभावाचा मित्र सुद्धा विश्वास ठेवण्यासारखा नसतो, कारण ते केव्हाही तुम्हाला फसवू शकतात. तुमच्या हाताखाली काम करणारा नोकर किंवा कर्मचारी, जो तुमच्यासमोर उलट उत्तर देतो, तो कधीही तुमचे असह्य नुकसान करू शकतो. अशा सेवकासोबत राहणे म्हणजे अविश्वासाचा घोट घेण्यासारखे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अध्यायात चाणक्याने लिहिले आहे की, कोणताही त्रास किंवा आपत्ती टाळण्यासाठी पैशाचे रक्षण केले पाहिजे, गरज पडल्यास पैसा खर्च करूनही महिलांचे संरक्षण केले पाहिजे. पण महिला आणि पैसा असला तरीही माणसाने स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.