Footwear Guide For Women : बाजारात महिलांच्या चपलांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. सण, समारंभ, पार्टी अशा प्रसंगी पेहरावानुसार महिला वेगवेगळ्या प्रकारच्या चपला घालताना दिसतात. जर पेहरावाला शोभेशी चप्पल नसेल तर संपूर्ण लूक बिघडतो असे त्यांना वाटते, त्यामुळे महिलांसाठी फुटवेअर केवळ एक अ‍ॅक्सेसरी नाही संपूर्ण लूकचा भाग असतो. त्यामुळे त्या आपल्या स्टाइलला शोभेल अशी पायांना आरामदायी वाटेल अशा चपला निवडताना दिसतात. पण, महिलांच्या चपलांचे नेमके किती प्रकार आहेत तुम्हाला माहितेय का? चला जाणून घेऊ…

महिलांच्या चपलांचे ‘हे’ प्रकार तुम्हाला माहितेयत का?

१) सँडल्स

सँडल्स महिलांचा उन्हाळ्यातील सगळ्यात आवडता पर्याय आहे. वजनाला हलकी, आरामदायी आणि विविध डिझाईनच्या सँडल्स बाजारात पाहायला मिळतात; जसे फ्लॅट सँडल्स, बीच सँडल्स, ज्वेलरी डिझाइन सँडल्स. सँडल्स कॅज्युअल कपड्यांवरही शोभून दिसतात. त्यामुळे लूक परिपूर्ण होतोच, शिवाय त्या पायांनाही आरामदायी वाटतात.

२) वेजेस

वेजेस म्हणजे हिल्समधील एक अधिक आरामदायक प्रकार. यामध्ये सोल संपूर्णपणे भरीव असतो, त्यामुळे हिल्स असतानाही चालताना त्रास होत नाही. समर पार्टी, डेट किंवा ऑफिससाठी योग्य वेजेस हा प्रकार कम्फर्टेबल वाटतो.

३) हिल्स

हिल्स म्हणजे महिलांसाठी सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक असतं. यामध्ये स्टिलेटो, ब्लॉक हील आणि किटन हील, पेन्सिल हील असे प्रकार असतात. हिल्स सहसा पार्टी, लग्न आणि फॉर्मल कार्यक्रमासाठी वापरल्या जातात. पण, हिल्स दीर्घकाळ वापरल्यास त्रास होऊ शकतो.

४) बूट

बूट थंडीतील सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. यामध्ये अ‍ॅंकल बूट्स, नी-हाय बूट्स आणि थाय-हाय बूट्स असे प्रकार आहेत. हे लेदर, सूट किंवा डेनिमसह छान दिसतात आणि एक सुंदर लूक येतो.

५) पंप्स

पंप्स हे क्लासिक आणि सॉफिस्टिकेटेड वाटणारे फुटवेअर आहेत. हे प्रामुख्याने फॉर्मल कपड्यांवर वापरले जातात. यामध्ये स्ट्रॅप नसते, हे लो-हील किंवा हाय-हील प्रकारात मिळतात.

६) फ्लिप-फ्लॉप्स

फ्लिप-फ्लॉप्स हे अतिशय आरामदायक आणि कॅज्युअल फुटवेअर आहेत. बाथरूम, बीच किंवा घरात वापरण्यास योग्य अशी ही चप्पल आहे. मात्र, खूप वेळ चालायचे असल्यास पायांना आधार वाटत नाही.

७) लोफर्स

लोफर्स म्हणजे कम्फर्ट आणि स्टाइलचे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, शूजचा हा एक प्रकार आहे, पण त्याला लेस नसतात. ऑफिस किंवा कॅज्युअल आउटफिटवर लोफर्स छान दिसतात.

८) एस्पाड्रिले

एस्पाड्रिले हे समर फ्रेंडली शूज आहेत. हे कॅनव्हॉस किंवा कापडाचे बनवलेले असतात. हलके आणि ट्रेंडी असे हे शूज ड्रेस आणि शॉर्ट्सवर छान दिसतात.

९) क्लॉग्स

क्लॉग्स लाकडी किंवा रबरी सोलचे बनवले जातात. पूर्वी ते शेतीकाम किंवा फॅक्टरीमध्ये वापरले जायचे, कारण ते पायांचे पूर्णपणे संरक्षण करायचे. आता मात्र हे स्टाइल स्टेटमेंट झाले आहेत.

१०) म्यूल्स

म्यूल्स बॅकलेस शूज आहेत, जे स्लिप-ऑन स्टाइलमध्ये असतात. हे फ्लॅट किंवा हिल्समध्ये उपलब्ध असून कॅज्युअल ते फॉर्मल आउटफिटवर वापरले जाऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक सण, समारंभ कार्यक्रम आणि वातावरणानुसार योग्य फुटवेअर निवडल्यास तुमची स्टाइल अधिक खुलून दिसते. मात्र, निवड करताना स्टाइलबरोबरच पायांना आराम मिळणेही महत्त्वाचे आहे.