वजन कमी होण्यासाठी स्त्रियांच्या बाबतीत प्रेमभंग कारणीभूत ठरू शकतो. जोडीदाराकडून नाकारले गेल्यानंतर स्त्रियांच्या वजनात सरासरी दोन किलोची घट होत असल्याचे अलीकडेच एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. अनेक वर्षांचे एखादे नाते तुटल्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ ‘एकटे’ राहिल्यास स्त्रियांचे वजन तब्बल सहा किलोपर्यंत कमी होऊ शकते. प्रेमभंगानंतर होणारी भावनिक उलथापालथ कमी प्रमाणात भूक लागण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे ४६ टक्के लोकांनी ‘डेली एक्स्प्रेस’ने नोंदविलेल्या अहवालात सांगितले आहे. तर ४७ टक्के लोकांनी प्रेमभंगाच्या घटनेनंतर अधिक आकर्षक दिसण्यासाठी आपणहून वजन घटवल्याचे म्हटले आहे. अन्य एका सर्वेक्षणात प्रेमाच्या नात्यात नसताना अनेकांचा आपल्या बारीक दिसण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे ६८ टक्के लोकांनी जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध संपुष्टात आल्यावर वजनाचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. जोडीदारांपैकी कुणाकडून नातेसंबंध संपवण्यात आले, हा घटकसुद्धा वजन कमी होण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. जोडीदाराकडून नाकारल्या जाणा-या स्त्रियांच्या तुलनेत स्वत:हून नाते संपवणा-या स्त्रियांच्या बाबतीत वजन घटण्याचे प्रमाण अर्ध्याने कमी असल्याचे समोर आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
ब्रेकअपनंतर स्त्रियांच्या वजनात घट होण्याची शक्यता
वजन कमी होण्यासाठी स्त्रियांच्या बाबतीत प्रेमभंग कारणीभूत ठरू शकतो. जोडीदाराकडून नाकारले गेल्यानंतर स्त्रियांच्या वजनात सरासरी दोन किलोची घट होत असल्याचे अलीकडेच एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
First published on: 05-02-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women lose more than 2kg post break up says research