एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.

इतिहास

ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.

एड्स होण्याची मुख्य कारणे

HIV / AIDS रुग्णाचे रक्त दुसऱ्या रूग्णाला दिल्याने एड्स होऊ शकतो.

दुषित रक्त असलेल्या सुई, इन्जेक्शन मधून देखील एड्स होऊ शकतो.

HIV बाधित आईकडून स्तनपान करताना मुलाला होऊ शकतो.

असुरक्षित लैंगिक संबंधामुळे देखील एड्स होऊ शकतो.

एड्सची लक्षणे

कित्येक आठवड्यापासून ताप येणे

कित्येक आठवडे खोकला असणे

विनाकारण वजन कमी होणे

तोंड येणे

भूक न लागणे, अन्नावरची वासना नाहीसी होणे

सतत जुलाब होणे

झोपताना घाम येत राहणे

एड्स आजाराविषयी गैरसमज

HIV / AIDS या असाध्य, अपरिचित असा रोग असल्याने चुकीचे गैरसमज बाळगणे हे सुद्धा समाजाच्या दुष्टीने घातक आहे.

HIV / AIDS हा रोग संसर्गजन्य रोग नाही आहे म्हणून रोगाच्या बाधित रूग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणामुळे या महाभयंकर रोगाची लागण होत नाही.

त्यामुळे हा रोग संसर्गजन्य रोग असल्याचा गैरसमज सर्व साधारण नागरिकांच्या मनात असतात. पण हा संसर्गजन्य रोग नाही आहे.

प्रथम येथे सापडले रुग्ण

जगात सगळ्यात पहिले १९८१ साली अमेरिकेत एड्सचा पहिला रूग्ण आढळला होता.

भारतामध्ये मद्रासमध्ये १९८६ साली पहिला HIV बाधित रुग्ण आढळला होता.

तसेच मुंबई शहरात मे १९८६ साली पहिला एड्सचा रुग्ण आढळला होता.

भारतात सर्वाधिक रूग्ण आंधप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र येथे आढळतात.