शाओमीचा नवीन स्मार्टफोन मिळणार ‘या’ किंमतीत! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

शाओमीचा रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (redmi note 10 pro max) हा स्मार्टफोन ग्राहकांना प्राथमिक किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर शाओमीचा रेडमी नोट १० प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हा स्मार्टफोन चांगल्या डीलवर उपलब्ध करण्यात आला आहे. Mi.Com कडून मिळालेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी हा फोन खरेदी करताना HDFC बँक कार्ड वापरलं तर रेडमी नोट १० प्रो मॅक्स फोनच्या खरेदीवर १,५०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. यामुळे हा फोन ग्राहकांना १८,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात या नवीन फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशन

शाओमीचा रेडमी नोट १० प्रो मॅक्स हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंट , ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असे तीन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये तुम्ही HDR कंटेंट खूप चांगल्या प्रकारे पाहू शकता. हा फोन १२०Hz डिस्प्लेसह येत आहे. दरम्यान या फोनचा डिस्प्ले इतका उत्तम आहे की तुम्ही बाहेर जास्त प्रकाशात हा फोन घेऊन गेल्यावर सुद्धा या फोनची स्क्रीन वरील नोटिफिकेशन अगदी सहजपणे वाचू शकाल. तसेच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर देण्यात आला आहे.

१०८ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा

फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिवाईसमुळे तुम्ही चांगला फोटो काढू शकतात. अशातच तुम्ही या फोनच्या कॅमेर्‍यातून रात्री सुद्धा उत्तम पद्धतीने फोटो काढू शकता. कारण या फोनचा नाइट मोड परफॉर्मन्स चांगला आहे. या फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील देण्यात आला आहे. यासह कॅमेरा मध्ये सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ५,०२० mAh ची मोठी बॅटरी आहे. जी सहजपणे एकदा चार्ज केल्यावर संपूर्ण दिवस तुमचा फोन चालू शकेल. यात ३३W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. या फोनसोबतच तुम्हाला त्याचे चार्जर देखील मिळणार आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट( USB Type-C port) देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Xiaomis new smartphone at this price know the price and specification scsm