आपण सर्वच परफ्यूमचा वापर करतो. विशेषतः उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी परफ्यूम आवश्यक असतो. आजकाल बाजारात वेगवेगळ्या सुगंधचे परफ्यूम उपलब्ध आहेत. अनेक लोक आपला परफ्यूम खूप जपून वापरतात. मात्र बऱ्याचदा परफ्यूम जास्त वेळ ठेवल्याने त्याची एक्सपायरी डेट निघून जाते आणि आपल्याला तो फेकून द्यावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कालबाह्य झालेले परफ्यूमही अनेक प्रकारे वापरू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे कालबाह्य झालेले परफ्यूम कोणीही वापरत नाही. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचेला संसर्ग होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. अशा परिस्थितीत अनेकांना त्यांचा आवडता परफ्यूम फेकून द्यावा लागतो. मात्र, हा परफ्यूम फेकून देण्याऐवजी तुम्ही याचा वापर घरातील इतर अनेक गोष्टींसाठीही करू शकता.

तुम्हालाही आहे जेवल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय? जाणून घ्या या सवयीचे गंभीर तोटे

रूम फ्रेशनर आणि कार फ्रेशनर

जर तुमचा परफ्यूम एक्सपायर झाला असेल आणि तुम्हाला त्याचा सुगंध आवडत असेल. तर तुम्ही ते फेकून देण्याऐवजी त्याचा रूम फ्रेशनर म्हणूनही वापरू शकता. खोलीत सुगंध पसरवण्यासाठी तुम्ही ते खोलीतही फवारू शकता. खोलीचा वास दूर करण्यासाठी एक्सपायर परफ्यूमची मदत घेतली जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या कारमध्येही ते स्प्रे करून आल्हाददायक वातावरण अनुभवू शकता.

बुटांवर वापरू शकता

उन्हाळ्यात, घामामुळे बुटांना दुर्गंधी येणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत बुटांचा वास नाहीसा होण्यासाठी तुम्ही एक्सपायर झालेल्या परफ्यूमचीही मदत घेऊ शकता. परफ्यूम शूजच्या वर आणि आत चांगले स्प्रे करा. शूजचा वास पूर्णपणे नाहीसा होईल.

कपडे आणि कार्पेटचा वास दूर करा

घरातील गालिचा साफ केल्यानंतर, ते सुगंधित करण्यासाठी तुम्ही एक्सपायर झालेले परफ्यूम वापरू शकता. यासाठी, व्हॅक्यूमिंग करताना, परफ्यूममध्ये थोडा कापूस भिजवा आणि व्हॅक्यूम क्लिनरमध्ये ठेवा.

वाढत्या उष्णतेसोबत वाढला ‘या’ आजारांचाही धोका; ‘ही’ लक्षणे दिसल्यास त्वरित सावध व्हा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट कार्पेटवरही परफ्यूम स्प्रे करू शकता. याशिवाय कपड्यांच्या ड्रॉवरमधून येणारा वास दूर करण्यासाठी कापूस परफ्युममध्ये बुडवून कपड्याच्या मध्यभागी ठेवा. यामुळे तुमच्या ड्रॉवर आणि कपड्यांना चांगला वास येईल.

बाथरूम आणि गाद्या

घराच्या गादी आणि बाथरूममधून येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही एक्स्पायर्ड परफ्यूम वापरू शकता. बाथरूममधून येणारा घालवण्यासाठी आंघोळीच्या काही वेळ आधी बाथरूममध्ये परफ्यूम स्प्रे करा, त्यामुळे बाथरूमचा वास निघून जाईल.

डस्टबिनच्या वासापासून मुक्त व्हा

डस्टबिनमधून येणार्‍या दुर्गंधीमुळे अनेकदा संपूर्ण घर दुर्गंधीयुक्त होते. अशा परिस्थितीत, दररोज डस्टबिन रिकामे केल्यानंतर, तुम्ही त्यात एक्स्पायर्ड परफ्यूम शिंपडू शकता. यामुळे डस्टबिन आणि त्यामध्ये पडलेल्या वस्तूंचा वास निघून जाईल आणि आजूबाजूची जागाही सुगंधित होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your favorite perfume expired do not worry use it in this way pvp
First published on: 12-04-2022 at 15:32 IST