scorecardresearch

कार्तिक महिन्याचा आज पहिला शनिवार, शनि महादशाने ग्रस्त राशीच्या लोकांनी करा ‘हे’ उपाय

धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू आहे.

lifestyle
शनीच्या राशी बदलामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होतो. ( file photo)


ज्योतिष शास्त्रानुसार नऊ ग्रहांमध्ये शनि हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कारण शनिदेव मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतात. ज्योतिषांच्या मते, जर शनीची वक्र दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती राजालाही रंक बनवते. पण जर शनिदेव प्रसन्न झाले तर भिकारी सुद्धा राजा होऊ शकतो. कारण सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने फिरतो, यामुळे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात.

शनीच्या राशी बदलामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होतो.काही राशींवर साडेसाती सुरू होते, तर काही राशींवर धैय्याची महादशा सुरू होते. २३ ऑक्टोबर म्हणजेच आज कार्तिक महिन्याचा पहिला शनिवार आहे. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यास विशेष फल प्राप्त होते. ज्यांना शनीची महादशा आहे त्यांनी कार्तिक महिन्यातील शनिवारी काही विशेष उपाय केल्यास त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.

सध्या 5 राशी आहेत, ज्यावर शनीची महादशा चालू आहे. धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू आहे, तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांसाठी धैय्या सुरू आहेत. कार्तिक महिन्यात शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी या राशीचे लोकं या उपायाचा अवलंब करू शकतात.

करा हे उपाय

आर्थिक अडचणींसाठी

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी शनिवारी रात्री वाहत्या नदीत पाच लाल फुले आणि पाच जळत्या दिव्या अर्पण कराव्यात. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाने शिजवलेला पराठा काळ्या कुत्र्याला खायला द्या. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळते.

ज्यांना शनीची महादशा आहे, त्यांनी काळ्या तिळ पाण्यात टाकून शिवलिंगावर अर्पण करावे. यासोबत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शनि मंदिरात बसून चालीसाही पाठ करू शकता. यावर भगवान शनी प्रसन्न आहेत.

(टीप:- वरील उपायांचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-10-2021 at 15:35 IST

संबंधित बातम्या