झुंबाने मागील काही वर्षात नवीन पिढीला अक्षरशः वेड लावले आहे. झुंबा म्हणजे वेगवेगळी गाणी आणि त्या तालावर थिरकणारे पाय, हलणारी कंबर आणि आपल्याच विश्वात रममाण असणारे आपले मन. पण हा नृत्यप्रकार सध्या व्यायाम म्हणून केला जातो. मूळ कोलंबियातील असणारा हा नृत्यप्रकार १९९० मध्ये जगासमोर आला. झुंबा या शब्दाला म्हणावा असा काही अर्थ नाही मात्र २००१ मध्ये अमेरिकेतील ‘फिटनेस क्वेस्ट’ या कंपनीने या शब्दाचे हक्क घेतले. ज्यांच्याकडे झुंबाचे सर्टीफिकेशन असते असेच लोक याचे ट्रेनिंग देऊ शकतात. मात्र सध्या इतर गोष्टींप्रमाणेच झुंबाच्या क्लासेसचा सुळसुळाट झालेला दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुंबाकडे व्यायाम म्हणून पाहताना –

झुंबा या नृत्यप्रकारात विविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या स्टेप्स, स्टाईल्स यांमधून हे नृत्य केले जाते. योग्य पद्धतीने हा व्यायामप्रकार करायचा असल्यास तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावा. यासाठी जिममध्ये जाण्याची आवश्यकता असते. मात्र अनेक जण यु-ट्यूबवरील व्हिडिओ पाहूनही झुंबा डान्स करताना दिसतात. झुंबा फिटनेस, झुंबा टोनिंग, झुंबा सेंटो, झुंबा सर्किट असे प्रकार यामध्ये पहायला मिळतात. पाण्यामध्ये केला जाणारा झुंबा हाही त्यातील आणखी एक प्रकार आहे. याला वयाचे बंधन नाही तसेच एक तास हा व्यायाम केल्यास ६०० कॅलरीज बर्न होतात.

अशी सापशिडी तुम्ही कधी पाहिलीये?

याकडे लक्ष द्या –

१. तुम्ही झुंबाला जात असाल तर शक्य असल्यास एका विशिष्ट वेळी, विशिष्ट शिक्षकाकडूनच शिकण्यापेक्षा वेगवेगळ्या शिक्षकांच्या बॅचला जा. त्यामुळे तुम्हाला या नृत्य प्रकाराचा अधिक चांगला अनुभव घेता येईल. प्रत्येक शिक्षकाची शिकविण्याची पद्धत वेगळी असते. त्याचा आपल्याला फायदा होतो.

२. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना त्या व्यायामाला साजेसे असे कपडे आणि बूट वापरणे आवश्यक असते. झुंबासाठी घोट्याच्या वर येतील असे आणि हलके कपडे असावेत. तसेच बूटही चांगल्या गुणवत्तेचे असावेत. बूट जमिनीवरुन घसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

३. झुंबा हा व्यायामप्रकार १ तास केल्यास नक्कीच घाम येतो. त्यामुळे आपल्याजवळ पाण्याची बाटली आणि नॅपकीन असणे आवश्यक आहे. तसेच एखादे फळ किंवा हलका आहार जवळ असल्यास त्याचा वेळप्रसंगी फायदाच होतो.

ही काळजी घ्यायला हवी –

१. हा व्यायामप्रकार तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुमच्या ट्रेनरला तशी कल्पना द्या.

२. आरशात तुम्ही शरीर पूर्ण पाहू शकता ना याकडे लक्ष द्या. तसे होत नसेल तर ट्रेनरला सांगा. मागे लपून राहू नका.

३. आपल्याला जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम करा. सगळे करतात म्हणून आपल्याला होत नसतानाही जास्तीचे करायला जाऊ नका. जास्त परिश्रम घेतल्यास शरीरावर ताण येण्याची किंवा दुखापत होण्याचीही शक्यता असते.

४. आपल्याकडे कोणी पहात आहे म्हणून लाजू नका. लहान मुलासारखे एकदम मोकळेपणाने नाचा. तुम्ही जर तुमच्या हाता-पायांच्या हालचालींकडे लक्ष देत बसलात तर त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार नाहीत.

मनाली मगर-कदम, फिटनेसतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zumba dance useful for good fitness facts and how to take care
First published on: 14-09-2017 at 16:35 IST