Live Updates
22:44 (IST) 3 May 2017
पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक संकेत
22:23 (IST) 3 May 2017
पाकिस्तानच्या नौदलाने भारताच्या ३० मच्छिमारांना ताब्यात घेतले.
21:37 (IST) 3 May 2017
मुंबईतील नागपाड्यातून आयएसआयच्या एजंटला अटक: टीव्ही वृत्त
21:13 (IST) 3 May 2017
चंद्रपुर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात पालेबारसा येथे तलावाजवळ पट्टेदार वाघाचा मृत्यू
18:22 (IST) 3 May 2017
दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील अंतरिक्ष भवनात आग- एएनआय
16:15 (IST) 3 May 2017
पुणे शहरातील कचराप्रश्नी विरोधक आक्रमक; मनसेच्या कार्यकर्त्यांचे महापौरांच्या घरासमोर कचरा फेक आंदोलन
16:13 (IST) 3 May 2017
सँडहर्स्टरोड रेल्वे स्थानकानजीकच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
15:55 (IST) 3 May 2017
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी आणखी एक बँक लुटली; पाच लाख रुपये घेऊन पसार
13:40 (IST) 3 May 2017
मध्यप्रदेशच्या विधिमंडळात जीएसटी विधेयक एकमताने मंजूर
12:51 (IST) 3 May 2017
मुंबईतील रस्ते बांधकामांसाठी खडी मिळत नसल्याने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
11:30 (IST) 3 May 2017
कोलकात्याच्या विमानतळावर तेलाचा टँकर उलटला; दोन जखमी
09:38 (IST) 3 May 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले केदारनाथाचे दर्शन; पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरात पूजा
07:59 (IST) 3 May 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले होणार
07:40 (IST) 3 May 2017
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पहाटेपासून गोळीबार सुरू
07:27 (IST) 3 May 2017
पुणे: शुक्रवार पेठेत एका तीन मजली वाड्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल. आग विझवित असताना शेजारील वाड्याची भिंत कोसळून अग्निशमन दलाचे ४ जवान, एक रहिवासी जखमी.
23:14 (IST) 2 May 2017
अहमदनगरमध्ये महिलेची दोन मुलांसह आत्महत्या, शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडीतील घटना
21:56 (IST) 2 May 2017
मुंबईतील वरळी येथील दीड वर्षाच्या मुलाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
21:23 (IST) 2 May 2017
पुण्यातील कचराप्रश्नी महापालिका आयुक्तांची बैठकही निष्फळ
19:09 (IST) 2 May 2017
'मन की बात बंद' करुन आता 'गन की बात' करा; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींनी सल्ला
18:45 (IST) 2 May 2017
यवतमाळमधील वणी तालुक्यात सहा महिन्याच्या मुलाची पित्याकडून हत्या, हत्येनंतर पित्याने केले समर्पण
17:35 (IST) 2 May 2017
पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने घेतला ५० वर्षीय महिलेचा बळी
17:05 (IST) 2 May 2017
जळगावमध्ये शिरसोलीतील फटाक्यांच्या कंपनीत स्फोट, दोन जणांचा मृत्यू
17:05 (IST) 2 May 2017
काश्मीर प्रश्नावर दिल्लीत गृहमंत्रालयात महत्त्वाची बैठक सुरू, राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद आणि अरुण जेटली बैठकीत उपस्थित.
15:30 (IST) 2 May 2017
सुलतान अझलन शाह कप: भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून १-३ ने पराभव
14:01 (IST) 2 May 2017
विरोधकांचा संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा कोकणात, रायगड ते बांदा असा मार्ग- टीव्ही वृत्त
13:57 (IST) 2 May 2017
उत्तराखंडच्या विधिमंडळात जीएसटी विधेयक मंजूर
13:47 (IST) 2 May 2017
जीएसटीसाठी २० ते २२ मे दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
13:24 (IST) 2 May 2017
छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १६ मेपर्यंत वाढ
12:39 (IST) 2 May 2017
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तृतीयपंथींचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन