• दातातून रक्त येत असल्यास किंवा पोटात आग होत असल्यास लिंबाचा रस साखर घालून सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
  • बऱ्याचदा संपूर्ण अंगाला ‘सुखी खाज’ बरेच दिवस चालू असते. त्यासाठी रोज अँटी अ‍ॅलर्जिक घ्यावे लागते. अशा वेळी दोन चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून सर्वागाला चोळून मग गरम पाण्याने आंघोळ करावी.
  • लघवी अडल्यास प्राथमिक उपाय म्हणून लिंबाच्या बिया ठेचून बेंबीत भराव्यात आणि बेंबीवर ताकात किंवा थंड पाण्यात भिजवलेली पाण्याची घडी ठेवत राहावी.
  • डोक्यातल्या कोंडय़ासाठी दोन चमचे खोबरेल तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन कापराच्या वडय़ांची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी चोळून लावावे. दोन तासांनी केस धुवावे.
  • एक कप गरम पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस घालून दुपारी व रात्री जेवणानंतर रोज याप्रमाणे ४५ दिवस घ्यावा. त्यामुळे चरबी (जाडी) कमी करण्यासाठी पथ्य आणि व्यायामाबरोबर याचा खूपच फायदा होतो.
  • आले घालून तयार केलेले लिंबाचे लोणचे हे अजीर्ण अपचनाच्या सर्व विकारांमध्ये किंवा तापानंतर अन्नपचनासाठी व तोंडाला चव येण्यासाठी देता येते.