05 June 2020

News Flash

दि. २४ ते ३० एप्रिल २०१५

मेष - या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय देणारे आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. व्यापार-उद्योगात थोडे पसे हाताशी असल्यामुळे तुम्ही एखादे धाडस करायला प्रवृत्त

| April 24, 2015 01:04 am

01vijayमेष या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय देणारे आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. व्यापार-उद्योगात थोडे पसे हाताशी असल्यामुळे तुम्ही एखादे धाडस करायला प्रवृत्त व्हाल. हितचिंतकांकडून तुम्हाला साथ मिळेल. जोडधंद्यातून कमाई होईल. नोकरीमध्ये एखाद्या कामानिमित्त संस्थेतर्फे विशेष सवलत बहाल केली जाईल. वरिष्ठ आणि सहकारी त्यांच्या स्वार्थापोटी तुम्हाला मदत करायला तयार होतील. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. 

वृषभ एखादा प्रश्न बराच काळ लांबत आलेला असेल तर आता त्यावरती तोडगा शोधून काढण्याकरिता तुम्ही हालचाल करायला सुरुवात कराल. व्यापार-उद्योगात एखादे मोठे काम मिळविण्याकरिता तुम्ही निकराने प्रयत्न कराल, पण कदाचित ते एकटय़ाने शक्य नसल्यामुळे मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. भागीदारी किंवा मत्रीकराराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ नवीन कामाची नांदी करून देतील. त्यामुळे कदाचित त्यांचे विचारचक्र बदलण्याची शक्यता आहे.

मिथुन ग्रहमान तुमच्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देणारे आहे. जे काम तुम्ही करत आहात ते अधिक चांगल्या पद्धतीने कसे पार पडेल याचा ध्यास तुम्हाला लागला असेल. व्यवसाय-उद्योगात एखादी नवीन योजना गिऱ्हाईकांसमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी जाहिरात आणि प्रसारमाध्यमांचा वापर कराल. जोडधंद्यातून थोडे फार पसे मिळाल्याने स्वत:ची हौस- मौज भागवून घ्याल. वरिष्ठांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्या कामांना महत्त्व देऊन इतर गोष्टी पुढे लांबवाल.

कर्क एखाद्या कामामध्ये यश मिळविण्याकरिता नेमकी कोणती पद्धत जास्त उपयोगी पडेल याचे उपजत ज्ञान तुमच्या राशीमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याचा तुम्ही हुकमी एक्का म्हणून आयत्या वेळेला वापर करता. या आठवडय़ात तुमच्या या गुणाला बरेच महत्त्व येईल. व्यापार-उद्योगामध्ये जे काम तुम्ही गेल्या दोन-तीन महिन्यांत करून ठेवलेले आहे त्यातून चांगला फायदा होण्याची लक्षणे दिसून येतील. नाकरीमध्ये वरिष्ठ महत्त्वाच्या कामात तुमचा सल्ला घेतील. त्यामुळे तुमची कॉलर ताठ असेल. 

सिंह एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला हवी असते त्यावेळी त्याच्याकरिता तुमची काहीही करायची तयारी असते. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे टाकण्याची ईर्षां तुमच्यात निर्माण होईल. उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता जनसंपर्क आणि प्रसिद्धीमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर कराल. नोकरीमध्ये तुमच्या आवडीच्या एखाद्या कामामध्ये तुमची निवड होईल. त्यानिमित्ताने देशात किंवा परेदशात फेरफटका करण्याची संधी मिळेल. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची नांदी होईल.

कन्या एकामागून एक कामे आणि जाबाबदाऱ्या येऊन पडल्याने गेल्या एक-दोन महिन्यांत तुम्हाला थोडीही विश्रांती मिळाली नव्हती. व्यापार-उद्योगात जे बेत तुम्ही मनाशी आखून ठेवले होते ते पूर्ण करण्याकरिता व्यक्तींच्या संपर्कात राहाल. त्याव्यतिरिक्त पशांची आणि इतर साधनसामुग्रीची तरतूदही तुम्हाला करावी लागेल. नोकरीमध्ये एखादे तुमच्याकरिता विनाकारण लांबलेले काम संपुष्टात आल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. तरीही वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत.

तूळ जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही जंग जंग पछाडता त्या नादात गरजेपेक्षा जास्त पसे खर्च करता. व्यवसाय- उद्योगात गिऱ्हाईकांचे लक्ष आकर्षति करण्याकरिता एखादी युक्ती अमलात आणाल. जनसंपर्क आणि जाहिरातबाजी या गोष्टी आवश्यक असल्यामुळे त्यामध्ये पसे गुंतवावे लागतील. नाकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या पशांचा किंवा सुविधांचा योग्य कारणाकरिताच वापर करा. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या निकडीच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक या आठवडय़ात ज्या प्रश्नामुळे तुम्ही बेजार झालेला होता त्यामध्ये तोडगा निघेल. व्यापार-उद्योगात एखादे काम पूर्ण करण्याकरिता तुमच्या प्रयत्नांव्यतिरिक्त मध्यस्थांची मदत घेण्याचा विचार तुमच्या मनात डोकावेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांकडून लाभणारी मदत यामुळे तुमचे मनोधर्य वाढेल. ज्यांना नोकरीत बदल करायचा असेल त्यांनी त्या दिशेने हळूहळू प्रयत्न सुरू करावेत. घरामध्ये कामाचा ताणतणाव कमी झाल्याने मनोरंजनाचा कार्यक्रम तुम्हाला सुचेल.

धनू कोणत्याही कामात जास्त विचार किंवा नियोजन न करता तुम्ही बेधडकपणे त्या कामाला सुरुवात करता आणि नंतर त्याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की थोडेसे नियोजन आवश्यक होते. व्यवसाय-उद्योगात थोडीफार सुधारणा झाल्यामुळे तुमच्या मनात अनेक तरंग उठू लागतील. पण कोणतेही बेत निश्चित करण्यापूर्वी त्यातील जमा-खर्च कागदावर मांडून बघा. नोकरीमध्ये आधी स्वत:च्या कामाला प्राधान्य द्या, त्यातून वेळ मिळाला तरच इतरांना मदत करा. नवीन जबाबदारी अंगावर घेऊ नका.

मकर या आठवडय़ात तुमच्या प्रयत्नांना नशिबाची थोडीफार साथ लाभल्यामुळे तुमच्या कामांना चांगली गती येऊ शकेल. कारखानदारांना त्यांचा कामाचा वेग वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरी खरेदी करावीशी वाटेल. नोकरीमध्ये एखादे अनपेक्षित काम मार्गी लागल्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा एक सौम्य धक्का बसेल. काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडल्याने तुमचे कौतुक वाटेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी कळेल.

कुंभ दीर्घकाळ ज्या इच्छा-आकांक्षा तुमच्या मनात तरळत होत्या त्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण आता निर्माण होणार आहे. व्यवसाय-उद्योगात नवीन काम स्वीकारताना तुम्ही तुमच्या अटी आणि नियम गिऱ्हाईकांपुढे परखडपणे मांडाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला देतील. तुमचा कामाचा दर्जा उत्तम राहील. काही जणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. घराची सजावट, डागडुजी वगरे गोष्टींत तुम्ही जातीने लक्ष घालाल. बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल.

मीन काम कोणतेही असो, ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही तुमच्या कल्पकतेचा उत्तम रीतीने वापर करता. व्यापार-उद्योगात आíथक चिंता नसल्यामुळे तुम्हाला आता काही नवीन प्रयोग करून बघावेसे वाटतील. कामाचा दर्जा वाढविणे हाच त्याचा खरा उद्देश असेल. व्यावसायिक लोकांना त्यांच्या अशिलांचे काम करताना एखादी अभिनव कल्पना सुचेल. वरिष्ठ संधीचा फायदा घेऊन एखादी नवीन जबाबदारी तुमच्या गळ्यात टाकतील.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2015 1:04 am

Web Title: astro
टॅग Horoscope
Next Stories
1 दि. १७ ते २३ एप्रिल २०१५
2 दि. १० ते १६ एप्रिल २०१५
3 दि. ३ ते ९ एप्रिल २०१५
Just Now!
X