अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com
पूर्वी वर्षांतून एक-दोनदाच होणारे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ आता वर्षभर सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचं अप्रूप काहीसं कमी झाल्यासारखं वाटतं आहे. म्हणूनच सादर आहे, त्याच पदार्थाचं तोंडाला पाणी सुटेल असं भन्नाट फ्युजन. हे फ्यूजन यंदाची दिवाळी चटकदार करणार हे नक्की.
मेथी शेव
साहित्य :
बेसन – २ वाटय़ा
हळद – १/२ चमचा
तिखट – १ चमचा किंवा चवीप्रमाणे
कसुरी मेथी – २ टेबल स्पून
िहग – १/४ चमचा
तेल – तळण्यासाठी
ओवा – १ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
कृती :
बेसनात हळद, तिखट, िहग, ओवा, मीठ, थोडी गरम केलेली कसुरी मेथी आणि मोहन घालून नीट एकत्र करून पीठ भिजवून घ्या. कढईत तेल गरम करून पिठाचा गोळा शेव पात्रात घाला. गरम तेलात शेव पाडून तळून घ्या.
गुलकंद चिरोटे
साहित्य :
बारीक रवा – १ वाटी
मदा – १ वाटी
साखर – ३ वाटय़ा
साजूक तूप – २ वाटय़ा तळण्यासाठी
आंबट दही – पाव वाटी
रोझ इसेन्स – १ चमचा
गुलकंद – अर्धी वाटी
मीठ – चिमूटभर
िलबाचा रस – १ चमचा
कृती :
रवा-मैदा परातीमध्ये घेऊन त्यात मीठ, आंबट दही घालून नीट एकत्र करून घ्या. त्यामध्ये तुपाचे मोहन घालून भिजवा. अर्धा तास ओल्या रुमालाखाली झाकून ठेवा.
साखरेचा दोन-तीन तारी पाक करा. त्यात रोझ इसेन्स व िलबाचा रस घाला. गुलकंद थोडासा गरम तसंच पातळ करून घ्या. भिजवलेला रवा-मदा नीट कुटून व चांगला मळून घ्या. त्याचे सारखे गोळे करून घ्या. त्यांच्या जाडसर पोळ्या लाटा. एका पोळीला तूप लावून त्यावर गुलकंद पसरा. त्यावर दुसरी पोळी ठेवा. दुसऱ्या पोळीलाही तूप व गुलकंद लावा. साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घाडी घालत जा. नंतर संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे करा. चौकोनी किंवा लांब लाटून तुपात तळून घ्या व लगेच साखरेच्या पाकात सोडा. नंतर बाहेर काढून चाळणीत उभे करून ठेवा. म्हणजे जास्तीचा पाक निथळून जाईल.
गुलकंद थोडासा गरम करून घ्या. एका डिशमध्ये गुलकंद चिरोटे ठेवून सव्र्ह करा.
टीप : चिरोटे पाकात घालताना पाक गरम असावा. गुलकंदाप्रमाणे चॉकलेट सॉस घालूनदेखील चिरोटे करू शकता. त्या वेळी पाकात ऑरेंज इसेन्स घालावा.
पावभाजी मसाला चकली
साहित्य :
चकलीची भाजणी –
अर्धा किलो
तेल – २ टेबल स्पून
पावभाजी मसाला –
२ टेबलस्पून
हळद – अर्धा चमचा
तिखट – अर्धा चमचा
किंवा चवीप्रमाणे
मीठ – चवीप्रमाणे
तीळ – १ चमचा
गरम पाणी – १ पेला
कृती :
पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तेल, मीठ, हळद, तिखट, पावभाजी मसाला आणि तीळ घाला. गॅस बंद करून त्यामध्ये चकली भाजणी घाला. नीट एकत्र करा. अर्धा तास झाकून ठेवा.
पीठ परातीत काढून पाण्याचा हात लावून चांगले मळा. परत झाकून ठेवा. हवा तेवढा गोळा घेऊन चकलीच्या साच्यामधे घालून चकल्या पाडून गरम तेलात तळा. डिशमध्ये चकली ठेवून त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोिथबीर घालून वर िलबाची फोड ठेवून सव्र्ह करा.
गुलकंद मालपोवा
साहित्य :
बारीक रवा – अर्धी वाटी
मदा – अर्धी वाटी
गुलकंद – अर्धी वाटी
मध – अर्धी वाटी
तूप – दोन चमचे
(पातळ केलेले)
साजूक तूप – तळण्यासाठी
ड्रायफ्रुट – पाव वाटी
कृती :
मालपोवा बनवण्याच्या आदल्या रात्री रवा – मदा एकत्र करून त्यात तूप घालून कोमट पाण्यात सलसर भिजवून ठेवा.
गुलकंदात थोडं पाणी घालून मऊ करून घ्या. रवा-मद्याचे पीठ फेटून घ्या. त्यात गुलकंद एकत्र करा. गरम तुपात पळीने लहान – लहान मालपोवा घालून तळून घ्या. बशीत ठेवून त्यावर मध व ड्रायफ्रुट घालून सव्र्ह करा.
तिखट चंपाकळी
साहित्य :
मदा – १ वाटी
बेसन – १ वाटी
तेल – पाव वाटी (मोहनासाठी)
तिखट – १ चमचा
हळद – अर्धा चमचा
ओवा – १ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
कृती :
मदा आणि बेसन एकत्र करा. त्यात हळद, तिखट, ओवा, मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून दोन तास ठेवा. नंतर चांगले मळून त्याचे पुरीप्रमाणे गोळे करून पुरीपेक्षा पातळ लाटा. पुरीच्या कडेला न तुटेल अशा बेताने सुरीने उभ्या चिरा पाडा. चिरांच्या दिशेने गुंडाळून त्याच्या दोन्ही बाजूंची टोके दोन्ही हातांच्या चिमटीत धरून दोन्ही टोकांना पीळ देऊन गरम तेलात तांबूस तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर सव्र्ह करा.
रबडी गुलाबजाम
साहित्य :
खवा – २ वाटय़ा बारीक
रवा – १/२ वाटी
तूप – तळण्यासाठी
खाण्याचा सोडा – १ चिमूट
साखर – २ वाटय़ा
दूध – थोडेसे
रबडी :
फुलक्रीम दूध – १ लीटर
साखर – ५ टेबल स्पून
फ्रेश क्रीम – ४ टेबल स्पून
केशर – ८ ते १० काडय़ा
बदाम – २ टेबल स्पून
स्लाइस केलेले
पिस्ता – १ टेबल स्पून
स्लाइस केलेले
कृती :
पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवा. सतत ढवळत राहा. उकळी आल्यावरही सतत ढवळत राहा. १ लिटरचे १/२ लिटर करा. त्यात केशर घाला. साखर घाला. सतत ढवळत राहा. नंतर फ्रेश क्रीम एकत्र करा. गॅस बंद करून त्यात बदाम-पिस्ता काप घाला. एकत्र करा. थंड करून फ्रिजमध्ये ठेवून गार करा.
गुलाबजाम कृती :
बारीक रवा दुधात भिजवा व तो खव्यात एकत्र करा. एक चिमूट सोडा घालून खवा खूप मळून घ्या. पोळीच्या कणकेप्रमाणे खव्याचा गोळा मळा. लागल्यास थोडे पाणी लावा. मळलेल्या गोळ्याचे गोळे किंवा लांबट गोळे करा. तूप गरम करून नंतर गॅस मंद करून त्यात खव्याचे गोळे हलकेच तळा. साधारण लालसर रंगाचे होईपर्यंत तळा. साखरेचा कच्चा पाक करून त्यात गरम गुलाबजाम सोडा. थोडय़ा वेळाने गुलाबजाम बाहेर काढून चाळणीत काढा म्हणजे जास्तीचा पाक निथळून जाईल. गुलाबजाम कोरडे करून घ्या. प्लेटमध्ये गुलाबजाम काढून त्यावर थंड रबडी घाला. वरती बदाम-पिस्ता काप घालून सव्र्ह करा.
चॉकलेट बालुशाही
साहित्य :
मदा – २ वाटय़ा
साजूक तूप – १/२ वाटी
आंबट दही – १/२ वाटी
खाण्याचा सोडा – १ चिमूट
तूप – तळण्यासाठी
चॉकलेट सॉस – २ वाटी
चॉकलेट चिप्स – वाटी
कृती :
मद्यात तूप, दही आणि सोडा घालून एकत्र करा. नंतर पाणी घालून मदा भिजवा आणि १/२ तास झाकून ठेवा. लाडवाएवढा गोळा घेऊन तो गोल करून अंगठय़ाने दाबून वडय़ासारख्या आकारात गरम तुपात तांबूस रंगावर तळून घ्या.
तळलेल्या बालुशाहीवर चॉकलेट सॉस घाला. एका ताटाला तुपाचा हात लावून त्यात बालुशाही काढा.
त्यावर चॉकलेट चिप्स घालून
सव्र्ह करा.
खजुराची खजुरी
साहित्य :
मदा – २ वाटय़ा
तूप – १/२ वाटी
गूळ – १/२ वाटी बारीक चिरलेला
मीठ – चवीप्रमाणे
खजूर – १/२ वाटी बिया काढून बारीक चिरलेला
कृती :
गुळात पाणी घालून गूळ विरघळवून घ्या. त्यात खजूर भिजत ठेवा. थोडय़ा वेळाने मिक्सरमधून काढा.
मद्यामध्ये मीठ व तूप गरम करून घाला. नीट एकत्र करून त्यात गुळ-खजुराचे मिश्रण व थोडेसे पाणी घालून मदा भिजवा. थोडा वेळ तसाच ठेवा. नंतर तुपाचे हात लावून चांगला मळा.
त्याचे २-३ मोठे गोळे करून ते पोळपाटावर लाटा. कातणीने शंकरपाळी पेक्षा मोठे उभे-आडवे कातून घ्या. तूप चांगले गरम करून नंतर मंद गॅसवर खजुरी तळून घ्या.
शेझवान शंकरपाळे
साहित्य :
मदा – २ वाटय़ा
बेसन – दीड वाटी
खाण्याचा सोडा – पाव चमचा
मीठ – चवीप्रमाणे
ओवा – अर्धा चमचा
तेल – तळण्यासाठी
शेझवान चटणी – अर्धी वाटी
तेल – पाव वाटी मोहनासाठी
कृती :
मदा-बेसन एकत्र करून त्यात खाण्याचा सोडा, मीठ, ओवा एकत्र करून त्यात अर्धी वाटी तेल गरम करून घाला. चांगले एकत्र करा. नंतर त्यात शेझवान चटणी घालून थोडे पाणी घालून घट्ट भिजवा.
अर्धा तास पीठ तसेच ठेवा. नंतर चांगले मळा. त्याची पोळी लाटून कातणीने शंकरपाळे कातून गरम तेलात तळून घ्या.
खाज्याचे रोल
साहित्य :
पारीसाठी :
बारीक रवा – १ वाटी
मदा – १ वाटी
साजूक तूप – १ चमचा
दूध – १ वाटी
तूप – पाव किलो तळण्यासाठी
रवा-मैदा एकत्र करून त्यावर तूप कोमट करून घाला. दूधही कोमट करून घाला. नीट मळून ओल्या रुमाला खाली ठेवा.
सारण :
कॉर्न फ्लोर – २ चमचे
साजूक तूप – ५ चमचे
साजूक तूप चांगले हाताने मळून कणी मोडून घ्या. त्यात हळूहळू कॉर्नफ्लोर घालत जा.
स्टिफग :
खजूर – १ वाटी बिया काढून
सुके अंजीर – ५ – ६
खसखस – १ चमचा भाजलेली
पिठीसाखर – पाव वाटी
साजूक तूप – १ टेबल स्पून
कृती :
खजूर आणि अंजीर एकदम बारीक चिरा. कढईत तूप गरम करून त्यामध्ये खजूर-अंजीर घालून चांगले मऊ होईपर्यंत परता. त्यामध्ये खसखस घालून नंतर थंड करा. नंतर त्यात पिठीसाखर घालून स्टिफग तयार करा.
भिजवलेल्या रवा-मद्याचे तुकडे करा. त्याला चांगले तूप लावून ते नीट कुटून घ्या किंवा मिक्सरमधून मळून घ्या. परत तुकडे करून वरील क्रिया करा. असे तीन वेळा करा. ओल्या रुमाला खाली झाकून ठेवा.
त्याचे तीन गोळे करा. त्याच्या पोळ्या लाटून घ्या. एका पोळीला हाताच्या बोटाने खड्डे पाडून त्यावर तूप लावा नंतर कॉर्नफ्लोरचे सारण नीट पसरा. वर दुसरी पोळी ठेवून वरील कृती करा. नंतर तिसरी पोळी ठेवूनही तेच करा. नंतर पोळ्यांची गुंडाळी करून तिचे सारखे तुकडे करून ओल्या रुमालाखाली ठेवा. याला लाटी म्हणतात.
लाटीच्या पापुद्रयाच्या बाजूवर थोडेसे तांदळाचे पीठ लावून ती लाटा. नंतर उलटी करून त्यामध्ये खजूर-अंजिराचे सारण भरून प्रथम खालील बाजू सारणावर दुमडा. नंतर दोन्ही बाजू दुमडा. शेवटी उरलेल्या बाजूला थोडासा पाण्याचा हात लावून पूर्ण रोल करा. अशा प्रकारे सगळे रोल करून ओल्या रुमालाखाली ठेवा. नंतर कढईमध्ये तूप चांगले गरम करून गॅस मंद करून त्यामध्ये २-२ रोल टाकून तुपामध्ये तळून घ्या. तळताना रोलवर तूप सतत उडवत राहा म्हणजे पापुद्रे सुटतात. पांढऱ्या रंगावर तळून घ्या.
खवा-बेसन-अक्रोड लाडू
साहित्य :
खवा – १ वाटी
बेसन – ३ वाटय़ा
अक्रोड – अर्धी वाटी बारीक तुकडे केलेले
लिसा साखर – ३ वाटय़ा (लिसा साखर न मिळाल्यास पिठीसाखर)
वेलची पावडर – १ चमचा
साजूक तूप – दीड वाटी
कृती :
खवा चांगला परतून घ्या. बेसन थोडे थोडे तूप घालून चांगले ब्राऊन रंगावर भाजून घ्या. आक्रोडाचे तुकडे कढईत गरम करून घ्या. खवा, बेसन आणि अक्रोड नीट एकत्र करा. त्यात वेलची पावडर आणि लिसा किंवा पिठीसाखर मिसळा. त्याचे लाडू वळा.
चंद्रकला
साहित्य :
मदा – २ कप
साजूक तूप – अर्धा कप
मदा तुपामध्ये नीट एकत्र करा. नंतर त्यामध्ये अर्धा कप कोमट पाणी थोडे थोडे घालून मदा मळून घ्या व अर्धा तास ठेवून द्या.
सारणासाठी
दूध – अर्धा लि.
साखर – १ वाटी
मावा – १ वाटी
(कढईत परतून घ्या)
बारीक शेव – ३ वाटय़ा
रोझ इसेन्स – ३-४ थेंब
बदामाचे काप – राव कप
वर्ख – ऐच्छिक
वेलची पावडर – १ चमचा
प्रथम दूध आटवून अध्रे करा. त्यामध्ये साखर, मावा, इसेन्स आणि वेलची पावडर नीट एकत्र करा. गॅस बंद करून शेव घालून नीट घाटून घ्या. तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून थापून घ्या. वरून बदामाचे काप पसरवा.
कृती :
परत मैदा चांगला मळून घ्या. त्याचे लहान लहान तुकडे करून त्याची पुरी लाटा. त्या पुरीवर सारण ठेवा. पुरीच्या कडांना पाण्याचा हात लावा. दुसरी पुरी लाटून त्यावर ठेवा. दोन्ही पुऱ्या नीट चिकटवून घ्या. हलक्या हाताने मुरड घाला किंवा कातणीने काता. गरम तुपात तळून घ्या. अशा प्रकारे सर्व चंद्रकला तळून घ्या. वरून काजू-बदामाचे फ्लेक्स भुरभुरवा.
चकली चाट
साहित्य :
तयार चकल्या – ६
कांदा – १ बारीक चिरलेला
शेव – १ वाटी
गोड चटणी – १ वाटी
(चिंच-खजूर चटणी)
पुदिना चटणी – १ वाटी
कोिथबीर – अर्धी वाटी
बारीक चिरलेली
टॉमॅटो – १ बिया काढून
बारीक चिरलेला
कृती :
चकलीचे मोठे तुकडे करून एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर कांदा, टॉमॅटो, गोड पुदिना चटणी घाला. वरून शेव घाला. कोिथबीर घालून सव्र्ह करा.
शेझवान कडबोळी
साहित्य :
तांदूळ – ४ वाटय़ा
हरभरे – १ वाटी
उडीद – १ वाटी
धने – १/२ वाटी
जिरे – १/४ वाटी
तीळ – १/४ वाटी
तिखट – चवीप्रमाणे
हळद – १/२ चमचा
िहग – १/४ चमचा
शेझवान सॉस – १ वाटी
तेल – १/२ वाटी
तेल – तळण्यासाठी
मीठ – चवीप्रमाणे
कृती :
तांदूळ, हरभरे, उडीद, धने आणि जिरे भाजून एकत्र करून दळा. पिठात १/४ वाटी गरम तेलाचे मोहन घाला. तसेच हळद, िहग, शेझवान सॉस, तीळ आणि तिखट चवीप्रमाणे घाला. एक वाटी उकळते पाणी घालून पीठ चांगले भिजवा. नंतर चांगले मळून त्याची कडबोळी करून गरम तेलात खमंग तळा. प्लेटमध्ये ठेवून सव्र्ह करा.
पावभाजी करंजी
साहित्य :
बारीक रवा – १ वाटी
मदा – १/२ वाटी
तेल – १ टेबलस्पून मोहनासाठी
मीठ – १/४ चमचा
तेल – तळण्यासाठी
रवा-मदा एकत्र करून तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवा. ओल्या रुमालाखाली १/२ तास तसाच ठेवा. १/२ त्याचे बारीक तुकडे करून थोडेसे तूप घालून मिक्सरमधून काढा. चांगले मळा. ओल्या रुमालाखाली गोळा ठेवून द्या.
भाजी :
उकडलेले बटाटे – २ कुस्करून
मटार – १ टेबल स्पून वाफवलेले
फरसबी – १ टेबल स्पून बारीक चिरून वाफवलेली
गाजर – १ टेबल स्पून बारीक चिरून वाफवलेली
कांदा – १ बारीक चिरलेली
तेल – १/४ वाटी
आलं-लसूण-मिरची क्रश – १ टेबल स्पून
लाल तिखट – १/२ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
पावभाजी मसाला – २ चमचे किंवा आवडीप्रमाणे
आमचूर पावडर – १ चमचा
टॉमॅटो – १ बिया काढून बारीक चिरलेला
कोिथबीर – १/४ वाटी
बटर – २ चमचे
कृती :
सर्व भाज्या मॅश करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यावर िहग घाला. त्यावर कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परता. त्यावर टॉमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता. त्यावर आलं-लसूण-मिरची क्रश, मीठ, तिखट आणि पावभाजी मसाला घालून परता. त्यावर सगळ्या भाज्या घालून चांगले परता. झाकण ठेवून वाफ आणा. वरून आमचूर पावडर व कोिथबीर घाला. भाजी चांगली कोरडी करा. त्यावर थोडे बटर घाला आणि नंतर भाजी थंड करा.
भिजवलेल्या रवा-मद्याच्या गोळ्याचे लहान – लहान गोळे करा. त्याची पुरी लाटा. पुरीत भाजी भरा. पुरी नीट बंद करून कातणीने काता. गरम तेलात करंजी तळून घ्या. सìव्हग डिशमध्ये करंजी ठेवून त्यावर कांदा, कोिथबीर व िलबू ठेवा. गरम गरम सव्र्ह करा.