फेसबुक आणि व्हॉटस्अॅपसारख्या आधुनिक माध्यमांनी कलावंतांना लोकांपर्यंत- रसिकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. त्यामुळे कला रसिकाग्रणी झाली. या नवमाध्यमांमुळे चर्चेत आलेले तरुण शिल्पकाराचे नाव म्हणजे विशाल सूर्यकांत शिंदे. लोअर परळच्या चाळींमध्ये एका लहान खोलीत राहणारा विशाल दुसरीत असल्यापासूनच गणपतीच्या मूर्ती साकारायला लागला. ते बाळकडू मिळाले ते गिरणी कामगार असलेल्या वडिलांकडूनच. त्यांनाही गणपती करण्याची आवड होती. पावसाळा सुरू झाला की, ते गणपती करायला घ्यायचे. कलावंताचे हात लाभलेल्या विशालने नंतर जेजे कला महाविद्यालयातून ललित कलेची पदवी घेतली. २०१० साली त्याने केलेल्या गणपतीची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आणि बालगणेशाची ती मोहक रूपे काही मिनिटांतच लोकप्रिय झाली. त्यानंतर गेल्या वर्षी ती व्हॉटस्अॅपवर सर्वाधिक फॉरवर्ड झालेली गणेश छायाचित्रे होती. बालगणेशाच्या मोहक रूपांविषयी विशाल सांगतो, मी एकत्र कुटुंबात राहतो. घरी बरीच मुले आहेत. रोज सरावासाठी त्यांचे स्केचिंग करताना ही कल्पना सुचली, लोकांना आवडली आणि आता बालगणेशाच्या मागणीसाठी रसिक रीघ लावतात. बऱ्याच वर्षांनंतर साच्याबाहेरच्या गणेशमूर्ती यानिमित्ताने पाहायला मिळाल्या, म्हणूनच विशालने साकारलेली मोहक मूर्ती मुखपृष्ठावर घेण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला!
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2015 रोजी प्रकाशित
रूप बरवे गणेशाचे
नवमाध्यमांमुळे चर्चेत आलेले तरुण शिल्पकाराचे नाव म्हणजे विशाल सूर्यकांत शिंदे.
Written by दीपक मराठे

First published on: 18-09-2015 at 01:27 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal suryakant shinde