01vbमशरूम सँडविच

साहित्य:
२ हॉटडॉग ब्रेड्स
१ चमचा बटर
१/२ चमचा तेल
१५ ते १८ मशरूम, उभे कापून
२ मध्यम कांदे, पातळ उभे कापून
१/२ वाटी किसलेले चीज
१/४ चमचा रेड चिली फ्लेक्स
lp44१ चिमटी मिक्स हब्र्ज
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
चिमटीभर साखर

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा.
२) कांदा छान परतला की मशरूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हब्र्ज, मीठ, मिरपूड आणि साखर घालून मिक्स करावे.
३) आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे.
४) ब्रेड एक बाजूने कट करावा, पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सव्‍‌र्ह करावे.
टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

lp45सबवे सँडविच

साहित्य:
२ हॉटडॉग ब्रेड
१ मध्यम कांदा, स्लाइस करून
१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या
१ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाइसेस
१ लहान लाल भोपळी मिरची, स्लाइसेस
लेटय़ुस, लांब पातळ चिरून
२ ते ३ चीज स्लाइस
२ चमचे मेयॉनिज
५-६ पिकल्ड अलापिनो पेपर्स स्लाइसेस
मीठ आणि मिरपूड चवीनुसार

कृती:
१) ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील.
२) ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाइस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होऊ द्यावे.
३) ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेटय़ुस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.
लगेच सव्‍‌र्ह करावे.

टीप:
१) यामध्ये आवडीनुसार भाज्या घालू शकतो. तसेच सँडविचसाठी स्पेशल सॉस मिळतात तेही वापरू शकतो उदा. स्वीट ओनियन सॉस वरील सॅँडविचबरोबर खूप छान लागतो.

lp46चीकपी आणि पेस्टो सँडविच

साहित्य:
८ ब्रेडचे स्लाइस
बटर
१ वाटी मऊ शिजवलेले काबुली चणे
१ चमचा लिंबाचा रस
थोडेसे मीठ आणि मिरपूड

पेस्टोसाठी:
दीड वाटी कोथिंबीर
२ ते ४ हिरव्या मिरच्या
२ चमचे ऑलिव्ह ऑइल
७-८ बदाम
३-४ लसूण पाकळ्या
२ चमचे लिंबाचा रस
चिमूटभर मिरपूड
चवीपुरते मीठ

इतर साहित्य:
किसलेले चीज
चिली फ्लेक्स
१ कांदा, पातळ गोल चकत्या
१ टॉमेटो, पातळ गोल चकत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती:
१) काबुली चणे मॅश करून घ्यावे. त्यात लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घालून मिक्स करावे.
२) पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा.
३) ४ ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे.
हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.
वैदेही भावे