विकी,
तुला philosopher म्हणाले तर कित्ती चिडलास तू..
तुला खरंच राग आला एवढा? आणि का?
यू नो आपल्या सगळ्यांमध्ये तू फारच serious आहेस. सारखं काही तरी serious बोलत आणि करत असतोस. so it was apriciation of you seriousness.
जाऊ दे.. तुझ्या नादाला लागून उगीचच am being serious.
तुला सांगू मला काय वाटतं.. life ना असं मस्त njoy करावं. ज्या moment ला जे घडेल ते तसंच्या तसं experience करावं. चलता है म्हणावं आणि पुढे जावं. तुम्ही serious आणि विचार करणारे लोक कसले तरी आग्रह धरत बसता. मला हेच पाहिजे, तेच नको आणि मग तसं नाही झालं की सगळं संपतंच. किंवा तसं झालं की तुम्हाला आनंदबिनंद नाही होत, उलट आता आपली responsibility वाढली म्हणून आणखी serious होता.
ए हे सगळं मी तुला म्हणत नाहीये.. total serious community म्हणते आहे. नाही तर लिहिशील एक मोठ्ठा mail..
तुझा माझ्यावर वैतागलेला चेहरा मला इथून दिसतोय.
no no इतका नको वैतागूस. त्यापेक्षा असं कर.. तुला केरळला जायचंय ना, मस्तपैकी केरळला जा. ते काय तुला केरळचं devolopment model बघायचं आहे, litaracy, education, health indcaters हे सगळं बघायचं आहे ते बघून ये!
या सगळ्यामधून जमलं तर backwater, houseboat हे सगळंसुद्धा njoy कर.
no no its not sercitistic again. मी कशाला तुला tonting करू ना?
अरे आणखी एक गंमत तुला सांगायचीच राहिली. काल ना मी एका TV show मध्ये participate केलं. त्यांचा एक youth show होता. त्यात त्यांना youth ला election, politics बद्दल काय वाटतं ते पाहिजे होतं. youth participation पाहिजे म्हणून त्या guest co ordinater नं बोलावलं होतं खूप जणांना. मीपण गेले. आपली सगळ्यांचीच ही पहिल election. त्यात या election मध्ये voting करणाऱ्यात youth ची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे आपला भाव त्यामुळे आता sollid वाढलाय. u kno tv, paper, magazin साठी सारखं कोण कोण प्रतिक्रिया मागत असतं. एक-दोन वेळा मला जरा tention आलं पण आता एकदम बिनधास्त.. नुसतं बोलायचं तर असतं. मग tention कायकू लेने का..
पण या सगळ्या लोकांना youth चा response वगैरे पाहिजे म्हणतात, पण youth participationचा प्रश्न आला की लगेचच सगळे गप्प. राजकारणाच्या माध्यमातून सोडवायला हवेत, असे तुमचे प्रश्न कुठले आहेत असा भरभक्कम प्रश्न विचारला परवाच्या त्या शोमध्ये. काय सांगायचं रे यांना आता?
मुळात आपल्या घरात, कॉलेजमध्ये कुठेही गेलं तर आईवडील, सर यांच्याशी बोलतानाच एवढी genration gap असते तर आपल्या आजोबांच्या वयाच्या MLA कडून काय अपेक्षा ठेवायच्या? तू इतर काही काही देशांचे leader बघ. आता ओबामाच बघ. कसे दिसतात, कसे वागतात, त्यांची body language कशी आहे.. I mean तुम्हाला त्यांची मतं पटो किंवा न पटो पण ते काय म्हणतात ते ऐकून तर घ्यावंसं वाटतं ना. तो आजचा आत्ताचा माणूस आहे असं वाटतं. नाही तर आपले leaders… मला तर एकाचंही भाषण ऐकावंसं वाटत नाही. हे म्हणजे आज काही तरी बोलणार, उद्या म्हणणार मी असं काही बोललोच नाही. मला इतका राग येतो ना विकी या लोकांचा.. यांना इथली गरिबी दिसत नाही, basic infrastructure चे problem दिसत नाहीत, आपण देश म्हणून कुठे अडलो आहेत ते दिसत नाही..पण असंही म्हणणं बरोबर नाही ना रे.. जे तुला मला समजतं ते त्यांना समजत नसेल का.. असं कसं होईल. पण म्हणजे यांना करायचंच नाहीये का काही? विकी बाकी सगळ्या गोष्टीत आपण devolopment करतो आहोत. मग politics मध्ये तसं का होत नाही? तिथे तेच ते cast politics, हिंदू मुस्लिम issues, कधी बदलणार हे सगळं? मला कधी कधी काय वाटतं सांगू? आपणच सरळ politics मध्ये जावं आणि सगळं बदलून टाकावं किंवा अशी एखादी जादूची कांडी मला मिळायला पाहिजे.. ती फिरवून सगळं जग मी मला पाहिजे तसं बदलून टाकीन किंवा अल्लाउद्दीनच्या गोष्टीतला जादूचा दिवा तरी मिळायला पाहिजे. मग तो राक्षस येईल आणि त्याला सांगून सगळं जग मला हवं तसं बदलून टाकीन मी..
या तीनमधला कुठला option तुला आवडला ?
किमी
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2014 रोजी प्रकाशित
@.कॉम : आपणच सरळ पॉलिटिक्समध्ये जावं…
विकी, तुला philosopher म्हणाले तर कित्ती चिडलास तू.. तुला खरंच राग आला एवढा? आणि का?
First published on: 04-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics