१. राधा आणि माधव ही जुळी भावंडे. कृष्ण हा माधवपेक्षा लहान आणि श्याम हा सावळ्यापेक्षा मोठा. सावळ्या जर राधेपेक्षा लहान असेल व श्याम कृष्णपेक्षा लहान असेल तर सर्वात मोठे कोण?

२. एका गोठय़ात चिंटू पाहणी करण्यासाठी गेला, तेव्हा त्याने तिथे ५४ पाय मोजले. गोठय़ात ३ गवळी दूध काढत असतील, तर म्हशींची संख्या किती?

३. अक्षर व क्षिती यांच्या परीक्षेचे निकाल लागले. अक्षरला क्षितीपेक्षा काही टक्के कमी पडले. पण त्याला मिळालेले व क्षितीला मिळालेले गुण हे एकमेकांच्या ४:५ या प्रमाणात असतील व दोघांच्याही टक्क्यांची एकूण बेरीज ९० भरत असेल तर अक्षरला किती टक्के मिळाले?

४. एका चौरसाकृती मदानाचे क्षेत्रफळ ३६०० चौरस फूट आहे. त्या मदानाच्या आकारात बदल करण्याचे ठरले आणि ते मदान आयताकृती करण्यात आले. जर नव्या मदानाचे क्षेत्रफळ ३६०० चौरस फूटच असेल मात्र त्याच्या लांबी आणि रुंदीत ५० फुटांचा फरक असेल तर त्या आयताकृती मदानाची लांबी किती?

५. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती ४० सेंटीमीटर आहे. त्या त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या बाजूच्या दुप्पट लांबीची असेल तर त्रिकोणाच्या सर्वात लहान बाजूची लांबी किती? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरे :
१) सर्वात मोठे भावंड राधा व माधव
२) १२ म्हशी (१२ गुणिले ४ व ३ गुणिले २ यांची बेरीज ५४)
३) अक्षरला ४० टक्के मार्क
४) आयताकृती मैदानाची लांबी ९० फूट
५) लहान बाजूची लांबी
१० सेंटीमीटर