06 March 2021

News Flash

तंत्रज्ञान : व्हॉट्सअ‍ॅपसाठी रेड सिग्नल

सध्या चर्चेत असणारं सिग्नल अ‍ॅप आहे तरी काय?

आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असणाऱ्या अनेकांनी आपला मोर्चा आता सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या अ‍ॅपकडे वळवला आहे.

स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

सध्या चर्चेत असणारं सिग्नल अ‍ॅप आहे तरी काय? या अ‍ॅपची एवढी चर्चा होण्यामागील कारणं काय? टेलिग्राम आणि  व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत ते कसं आहे? या आणि इतर प्रश्नांचा घेतलेला हा शोध

एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या विशिष्ट कंपनीची एकाधिकारशाही असते. मात्र अचानक असं काही घडतं की या एकाधिकारशाहीला धक्का लागेल की काय असं वाटू लागतं. असंच चित्र सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत दिसत आहे.  ४ जानेवारीला आपल्या नव्या सेवाशर्ती (टम्र्स आफ सव्‍‌र्हिस) जाहीर केल्यापासून व्हॉट्सअ‍ॅप प्रचंड चर्चेत आहे. या सेवाशर्तींच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांंकडून सक्तीने सहमती घेत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असणाऱ्या अनेकांनी आपला मोर्चा आता सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या अ‍ॅपकडे वळवला आहे. केवळ वापरकर्तेच नाही तर काही देशांमधील सरकार, प्रतिष्ठित व्यक्तींनीही या नव्या अ‍ॅपला जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे या नव्या अटी व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेसाठी मारक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅपला थेट आव्हान देणाऱ्या याच सिग्नलसंदर्भात थोडं फार..

व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारी रोजी नव्या सेवाशर्तींसंदर्भात पहिल्यांदा जाहीर खुलासा केला. त्यानंतर तीनच दिवसांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून चर्चेत असणाऱ्या स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं. यामध्ये त्यांनी केवळ दोन शब्दांमध्ये सिग्नल वापरण्याचं आवाहन केलं होतं. यूज सिग्नल या दोन शब्दांचं ट्वीट प्रचंड व्हायरल झालं. याचा परिणाम असा झाला की सिग्नल अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली. भारतामध्ये हे अ‍ॅप टॉप ट्रेण्डिंग अ‍ॅप्सच्या यादीत अव्वल स्थानी आलं. या संदर्भात सिग्नलनेच ट्विटरवरून ९ जानेवारी रोजी माहिती दिली. भारतच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलॅण्ड, हाँगकाँग आणि स्वित्झरलॅण्डसारख्या देशांमध्येही हे अ‍ॅप सर्वाधिक चर्चेतील अ‍ॅप ठरल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

समाजमाध्यमांवर आजपर्यंत आपण एखादी व्यक्ती रातोरात सेलिब्रिटी होतानाच्या घटना आहेत. मात्र एखाद्या अ‍ॅपबद्दल पहिल्यांदाचं असं घडल्याचं दिसून आलं. एकीकडे सिग्नलला वापरकर्त्यांंनी गी्रन सिग्नल दिला असतानाच दुसरीकडे व्हॉट्सअ‍ॅपवरून सिग्नलवर येणाऱ्यांचेही प्रमाणही वाढत होते. ११ जानेवारी रोजी भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं. ‘व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक त्यांच्या एकाधिकाराचा भारतात चुकीचा वापर करत असून लाखो युजर्सची प्रायव्हसी गृहीत धरली जातेय. आता आपण सिग्नल अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करायला हवी’, असं विजय शेखर यांनी म्हटलं. दरम्यान केवळ अ‍ॅण्ड्रॉइडच नाही तर अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्येही सिग्नलने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केल्याचं चित्र पाहायला मिळालं. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

सायबर सुरक्षातज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी सध्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि सिग्नल या तिन्ही अ‍ॅपची तुलना केली आहे. या तिन्ही  अ‍ॅपमध्ये फरक दाखवणारा हा तक्ता

या सर्व तुलनेनंतर अ‍ॅड प्रशांत माळी यांनी सिग्नल हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामपेक्षा वापरण्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचेही म्हटले आहे. टेलिग्राम हे रशियन बनावटीचे असल्याने त्यावर सायबर हल्ले होण्याची सतत भीती असते असंही माळी सांगतात. तर सिग्नलची निर्मिती हीच ओपन सोर्स म्हणजेच सर्व समावेश पद्धतीची संवाद यंत्रणा उभरण्याच्या चळवळीमधून झाल्याने या अ‍ॅपच्या निर्मितीमध्ये युझर्स म्हणजेच वापरकर्त्यांंना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सिग्नल हे इतर दोन्ही अ‍ॅपच्या तुलनेत उजवे ठरत असल्याचे या तुलनेमधून दिसून येतं.

सिग्नलची इतर वैशिष्टय़े

सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून वापरर्त्यांंची खासगी माहिती (डेटा) मागितली जात नाही किंवा ती स्टोअरही केला जात नाही. त्यामुळे ही माहिती कोणासोबत शेअर करण्याचा आणि त्यामधून वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सिग्नलवर फक्त वापरकर्त्यांचा फोन नंबर घेतला जातो. ग्रुप व्हिडीओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचं म्हणजेच सेल्फ डिस्ट्रक्शन फिचरही यामध्ये आहे. ‘डेटा लिंक्ड टू यू’ हे विशेष फिचरही सिग्नलमध्ये देण्यात आलं आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच या अ‍ॅपवरील चॅटिंग ही पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.

जाता जाता

सिग्नलची वाढती लोकप्रियता आणि झालेला गोंधळ पाहता व्हॉट्सअ‍ॅपने दोन वेळा नवीन धोरणांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.  ‘वापरकर्त्यांंचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच १०० टक्के एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. धोरणांमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिलं आहे. नवीन धोरण बदल हा केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचा दावा कंपनीने पहिल्यांदा दिलेल्या स्पष्टीकरणात केला होता.

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केल्याची माहिती ट्विटरवरून दिलीय.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एडरेगन यांनीही व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली. एवढंच नाही तर तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष एडरेगन यांनी ११ जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या बीपवर (इ्रढ) ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इन्क्रिप्टेड अ‍ॅप असून या अ‍ॅपची मालकी तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या तुर्कीमधील कंपनीकडेच आहे.

इलॉन मस्क यांनी ट्वीट केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारामध्ये सिग्नल अ‍ॅप बनवणारी कंपनी म्हणून गुंतवणूकदारांनी सिग्नल अ‍ॅडव्हान्स नावाच्या कंपनीचे समभाग खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या कंपनीच्या समभागांचे मूल्य काही दिवसांमध्ये चक्क ११,७०८ टक्क्यांनी वधारल्याचे पाहायला मिळालं. ०.६० डॉलरवरून एका समभागाची किंमत काही दिवसांमध्ये थेट ७० डॉलर्सवर पोहचली.

पहिल्यांदाच व्हॉट्सअ‍ॅपला एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दुसऱ्या अ‍ॅपचा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवरही अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणांना विरोध करत इतर पर्याय शोधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे. २०१४ पासून इन्स्टंट मेसेजिंगच्या क्षेत्रात अव्वल असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपची मक्त्तेदारी मोडण्यासाठी सध्या बराच काळ असला तरी सध्या तरी या सिग्नलच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे व्हॉट्सअ‍ॅपची चिंता नक्कीच वाढली असून वापरकर्त्यांंना गृहीत धरणे धोकादायक ठरू शकते याचा अंदाज आता कंपनीला असा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:34 am

Web Title: signal app tantradnyan dd70
Next Stories
1 लोकजागर : बर्ड फ्लू परतलाय!
2 आदरांजली : सूर्यसाधक
3 राशिभविष्य : १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२१
Just Now!
X