साहित्य :

कणकेसाठी साहित्य :

अर्धा कप मैदा, दोन कप मक्याचे पीठ (पिवळ्या), अर्धा टीस्पून मीठ, सव्वा कप कोमट पाणी.

पुरणासाठी साहित्य :

दीड कप मक्याचे कोवळे दाणे, साल काढून बारीक तुकडे केलेला एक बटाटा, दोन टेबलस्पून तेल, एक टीस्पून ठेचलेले लसूण, एक बारीक चिरलेला कांदा, एक टीस्पून लाल मिरचीची फ्लेक्स किंवा पावडर, एक चमचा मीठ, एक टीस्पून मिरी, चार टेबलस्पून टोमॅटो प्युरी.

कृती :

कणिक भिजवणे. ती झाकून एक तास बाजूला ठेवणे.

एम्पान्डासच्या आतल्या पुरणासाठी : प्रेशर कुकरमध्ये तेल घाला. त्यात लसूण ठेचून घाला. कांदा परता. कांदा मऊ झाल्यावर त्यात बटाटे, लाल मिरचीचे फ्लेक्स, मीठ, मिरी आणि टोमॅटो प्युरी घाला. सगळं एकत्र करून कुकरची एक शिट्टी होऊ द्या. ते मिश्रण गार झाल्यावर छोटय़ा पुऱ्या करून करंजीसारखे सारण भरून सालसाबरोबर सव्‍‌र्ह करावे.

बेबी पोटॅटोज विथ हर्ब

साहित्य :

सोललेले अर्धा किलो बटाटे, लहान बटाटे नसतील तर मोठा बटाटा सोलून स्कूपरने स्कूप करण, दोन टेबलस्पून बटर किंवा तेल, एक टीस्पून क्रश केलेली काळी मिरी, चार टेबलस्पून टोमॅटो केचअप, अर्धा ते पाऊण कप ताजे हर्ब, बॅसील/ पारसल/ पुदिना/ कोथिंबीर/ रोझमेरी यातले कुठलेही दोन-तीन कॉम्बिनेशन्स वापरणे.

कृती :

बटाटे उकडून घेणे. नंतर हे बटाटे चाळणीत निथळत ठेवणे. फ्रायपॅनमध्ये बटर किंवा तेल घालून त्यात क्रश्ड मिरी, टोमॅटो केचअप व हर्ब घालणे. हे मिश्रण चांगले परतून घेणे. त्यात उकडलेले बटाटे घालणे. मीठ टाकून पुन्हा एकदा मिश्रण चांगले परतून घेणे आणि गरमागरम वाढणे.

लाजवाब आलू

साहित्य :

एक चमचा तीळ, अर्धा चमचा भाजलेले आणि मिक्सरमध्ये बारीक केलेले जिरे, सालासकट दोन-तीन बटाटय़ांच्या मोठय़ा फोडी, चवीनुसार मीठ, एक चमचा तिखट, पाव चमचा आमचूर पावडर, तळण्यासाठी तेल.

कृती :

पातेल्यात पाणी घालून बटाटे थोडेसे उकडून घेणे. उकडलेले बटाटे तेलात चांगले तळून वरील मसाला एकत्र करून त्यावर छान पसरणे.

मुगाचे डाळवडे

साहित्य :

अर्धा कप उडदाची डाळ चार ते पाच तास एकत्र भिजत घालणे, दोन कप सालासह मुगाची डाळ, दोन-तीन लसणाच्या पाकळ्या, पाच-सहा हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुगाची हिरवी डाळ आणि उडीदडाळ चार ते पाच तास भिजत घालणे. त्यानंतर ते मिक्सरमधून अर्धवट वाटून घेणे. त्यात लसूण, मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेणे. इतर सर्व साहित्य घालून एकत्रित करून घेणे. कढईमध्ये तेल तापत ठेवणे. त्यात मुगाचे वडे तळून घेणे. गरमागरम खायला घेणे.

टीप : मुगाचे वडे उभ्या कापलेल्या कांद्याबरोबर व तळलेल्या हिरव्या मिरच्यांबरोबर खूपच रुचकर लागतात.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com