23 September 2020

News Flash

२३ ते २९ मे २०१४

मेष - थोडासा तणाव असला तरी तुम्ही आता बिनधास्त बनून जीवनाचा आस्वाद घ्यायचा ठरवाल. या नादात नेहमीच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष होईल. पण त्याची पर्वा तुम्ही करणार

| May 23, 2014 01:16 am

मेष थोडासा तणाव असला तरी तुम्ही आता बिनधास्त बनून जीवनाचा आस्वाद घ्यायचा ठरवाल. या नादात नेहमीच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष होईल. पण त्याची पर्वा तुम्ही करणार नाही. व्यापार उद्योगात ठरविलेले ईप्सित पूर्ण करण्याकरिता वेळप्रसंगी वाम मार्गाचा उपयोग करण्याची तुमची तयारी असेल. पण तसे करण्याने धोका वाढेल. पशाचा वापर जपून करा. नोकरीमध्ये संस्थेतर्फे मिळणाऱ्या सुविधांचा आणि अधिकारांचा भरपूर वापर कराल. घरामध्ये एकाचे हट्ट पुरविले की दुसऱ्याचे बिनसते असा अनुभव येईल.

वृषभ एकाच वेळी मौजमजा आणि न चुकणारी कर्तव्ये या दोन डगरींवर हात ठेवून काम करायचे आहे. वेळेचा सदुपयोग करा. व्यवसाय उद्योगामध्ये पशाची आवक समाधानकारक राहिल्यामुळे गुंतवणुकीचा एखादा नवीन पर्याय तुमच्या मनात येईल. स्पर्धकांबद्दल मिळालेली माहिती लक्षात घ्या. नोकरीमध्ये ज्या कामातून तुमचा फायदा आहे अशा कामांना तुम्ही प्राधान्य द्याल. घरामध्ये मुलांसंबंधी आणि विशेषत: त्यांच्या करिअरविषयी एखादा महागडा पर्याय निवडावा लागतो की काय अशी भीती वाटेल.

मिथुन सर्व ग्रहस्थिती तुमच्या इच्छा आकांक्षा पल्लवित करणारी आहे. त्याच्याकरिता लागणाऱ्या वेळेचा आणि खर्चाचा तुम्ही थोडाही विचार करणार नाही. जो क्षण तुमच्यासमोर आहे त्याचा पुरेपूर आनंद लुटाल. व्यवसाय उद्योगात स्पर्धकांना शह देण्यासाठी एखादी वेगळी योजना आखाल. नोकरीमध्ये ज्या कामामध्ये विनाकारण दिरंगाई झाली होती त्यामधे हळूहळू गती येईल. एखाद्या चांगल्या संधीकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सगळ्यांची इच्छाआकांक्षा पूर्ण कराल. स्वत:ची हौसमौजही भागवून घ्याल.

कर्क एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. तुम्ही एखादे काम कर्तव्यबुद्धीने हातात घ्याल आणि इतरांकडून त्याला प्रतिसाद मिळविण्याकरिता मिनतवारी करावी लागेल. व्यापार उद्योगात महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता स्वत: पार पाडलीत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. जोडधंद्यातून फायदा मिळेल. ज्यांना नवीन नोकरीकरिता प्रयत्न करायचे आहेत त्यांनी घरापासून लांब राहण्याची तयारी ठेवावी. परदेशात नोकरीकरिता प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.

सिंह तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. माणसामधली इच्छाशक्ती हीच त्याला सतत प्रगतीपथावर नेत असते. व्यापार उद्योगात मोठय़ा प्रमाणावर काम करून प्रगतीचा आणि उत्पन्नाचा एक नवीन उच्चांक तुम्हाला गाठावासा वाटेल. त्याकरता जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीतल्या एखाद्या चांगल्या कामासाठी तुमची निवड झाल्यामुळे तुमची कॉलर ताठ असेल. घरामध्ये वास्तुशांत, विवाह ठरविणे किंवा तशाच प्रकारचे शुभकार्य पार पडेल.

कन्या काही खर्च असे असतात की जे आपण स्वत:हून करायला तयार होता. गेल्या काही महिन्यांतील कामाच्या व्यापामुळे तुम्हाला विश्रांती आणि मनोरंजन हे दोन शब्दच माहीत नव्हते. या आठवडय़ामधे दैनंदिनीतून बाहेर पडून स्वत:करिता थोडा वेळ घालवायचे ठरवाल. व्यापार उद्योगामध्ये तुमचे लक्ष कामगारांवर असू द्या. नोकरीमध्ये फारसे काम करण्याची तुमची इच्छा नसेल, पण ज्यातून तुमचा आíथक व इतर फायदा आहे अशा गोष्टींना महत्त्व द्याल. वेळ आणि पसे हातात राखून ठेवा.

तूळ जी परिस्थिती पूर्वी निर्माण झाली होती त्यामुळे तुम्ही विचारात पडला होता. आता तेथून मार्ग काढण्याकरिता एखादा मार्ग दिसण्याची चिन्हे दिसू लागतील. त्याकरिता अजूनही काही दिवस थांबावे लागेल. पण त्यात सुधारणा दिसल्यामुळे तुम्ही आशावादी बनाल. जी कामे पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामध्ये ओळखींमुळे थोडीफार प्रगती होईल. व्यवसाय उद्योगात काही काळापुरते कर्ज किंवा मदत मिळू शकेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची गरसोय कमी करण्याचे आश्वासन देतील. घरामधे प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल.

वृश्चिक तुमचे खर्च वाढवणारे ग्रहमान तुम्हाला लाभत आहे. पण त्याच वेळी पशाची तरतूद झाल्यामुळे जमा-खर्चाची तुम्हाला जास्त चिंता नसेल. व्यापार उद्योगात काही खर्च तुम्ही स्वखुशीने कराल, तर काही खर्च तुमच्यावर लादले जातील. स्पर्धकांविषयी माहिती मिळवा, त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. नोकरीमध्ये सगळ्यांशी मिळते जुळते घेऊन तुम्हाला उद्दिष्ट गाठावे लागेल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळ कसा गेला हे समजणार नाही.

धनू ज्या कामाविषयी तुमच्या मनामध्ये बरीच उत्सुकता होती, अशा कामांना आता गती मिळेल. व्यवसाय उद्योगात तांत्रिक अडथळे दूर झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. योग्य व्यक्तींशी संगत करा. नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याला आणि प्रावीण्याला वाव असल्यामुळे संस्थेकडून तुम्हाला बरीच मागणी राहील. काही व्यक्तींना पदोन्नतीचा मानही मिळेल. घरामध्ये प्रिय व्यक्तींच्या जीवनातील सौख्यकारक समारंभ साजरा होईल. मात्र सगळ्यांची मने सांभाळणे कठीण होईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.

मकर आळस करणे किंवा निष्कारण वेळ वाया घालवणे तुम्हाला आवडत नाही. पण सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला नेहमीच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार उद्योगामधे एखादी अव्यवहारी पण तुम्हाला आवडणारी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्ही नाद सोडून द्याल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी सांगितलेली तातडीची कामे इतरांवर न सोपवता स्वत:च हाताळा. आवडत्या व्यक्तींनी हट्ट केल्यामुळे घरामध्ये काही वेगळे कार्यक्रम ठरतील.

कुंभ महत्त्वाच्या ग्रहांची साथ आता तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रचंड उत्साही दिसाल. जे बेत किंवा विचार अर्धवट राहिलेले होते ते पूर्ण करण्याचा ध्यास लागेल. व्यापार उद्योगात पशाची चणचण जाणवेल. पण ती भरून काढण्याकरिता तुम्ही अथक प्रयत्न कराल. उद्योगपतींना मोठे कर्ज काढावे लागेल. नोकरीमधल्या वरिष्ठांच्या कल्पना तुम्हाला मनोमन पटणार नाहीत. पण नाईलाजाने तुम्ही त्या अमलात आणाल. तरुणांना आवडत्या व्यक्तीचे दर्शन झाल्याने बरे वाटेल.

मीन कामाचा कितीही ताणतणाव असू दे पण तुम्ही मात्र स्वच्छंदी बनाल. रोजच्या कर्तव्यात अडकून न पडता स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल. व्यवसाय उद्योगात नवीन काम मिळण्यासाठी धडपड कराल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना तेथून काही महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडते ते मिळण्याची शक्यता निर्माण होईल. त्यातून जरी आíथक फायदा वाढला नाही तरी तुमचे मन रमेल. पसे प्रमाणाबाहेर खर्च होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 1:16 am

Web Title: weekly horoscope 2
Next Stories
1 ९ ते १५ मे २०१४
2 २५ एप्रिल ते १ मे २०१४
3 १८ ते २४ एप्रिल २०१४
Just Now!
X