१. दोन संख्यांचा गुणाकार २५० आहे, त्यातील मोठय़ा संख्येस लहान संख्येने भागले असता उत्तर १० येते, तर त्या दोन संख्या कोणत्या?

२. गणित या विषयातील २८ विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ५० आहे. त्यापकी ८ जणांनी शाळा सोडली. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्ये पाचने वाढ झाली, तर शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती?

३. तीन वर्षांपूर्वी अनय आणि राहुल यांच्या वयाची सरासरी १८ वष्रे होती. आता त्यांच्या गटात राजश्रीचाही समावेश झाला. त्यामुळे त्यांचे सरासरी वय २२ झाले तर राजश्रीचे वय किती?

४. एका संख्येची पाऊणपट ही त्या संख्येपेक्षा १९ ने लहान आहे, तर ती मूळ संख्या कोणती?

५. दोन संख्यांमधील फरक ८ आहे. आणि त्यांच्या बेरजेची एकअष्टमांश ३५ आहे, तर ती संख्या कोणती?

६. एका संख्येत त्याच्या २० टक्के संख्या मिळवली असता त्यात ४० ने वाढ होते. तर ती संख्या कोणती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरे :
१. त्या दोन संख्या ५ आणि ५०.
२.शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ३७.५.
३. राजश्रीचे वय २४ वष्रे.
४. मूळ संख्या ७६.
५. १३६, १४४
६. ५०