22 July 2019

News Flash

पुनरागमनाय च

२०१४ चा आणि पर्यायाने ‘जनात-मनात’चा हा शेवटचा लेखांक. आज आपल्या साऱ्यांचा निरोप घेताना संपूर्ण वर्षांचा पट डोळ्यांसमोर उलगडतो आहे.

डिसेंबर

हा हा म्हणता वर्ष सरते आणि डिसेंबर महिना येतो. आता आता सुरू झाल्यासारखे वाटणारे २०१४ संपतेय. ऋतू कूस बदलतोय. थंडीची चाहूल लागलीय.

बदलता भारत

घरामध्ये अनेकदा तात्त्विक चर्चा रंगतात. दोन गट पडतात आणि तावातावाने मुद्दे मांडले जातात. अमेरिकेच्या आरोग्यनीतीपासून महाराष्ट्राच्या दुष्काळापर्यंत कोणतेच विषय वज्र्य नसतात.

आनंदाचा रंगमंच

दूरदर्शनवरची सेंचुरी प्लायची जाहिरात माझ्या मनात नवी आंदोलने निर्माण करते. जेवणाच्या टेबलावर गप्पा-मस्करीमध्ये रंगलेले कुटुंब..

अभिमान.. गर्व

स्वाभिमान.. अभिमान.. गर्व आणि ताठरता हे एकाच रेषेवरचे चार िबदू आहेत. कोणाची व्याप्ती कुठे संपते आणि पुढचा गाव कुठे सुरू होतो, हे कधी कधी लक्षात येत नाही आणि गफलत

झुंबर आणि समई

‘‘सर, ‘जनात-मनात’मधून आजच्या महाविद्यालयीन जीवनावर लिहा..’’ एक आर्जवी पत्र आलं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. महाविद्यालय.. खूप काही बदललंय.

स्वाभिमान

महात्माजींचे चरित्र मला नेहमीच भुरळ घालते. बापू म्हणून त्यांचा झालेला प्रवास आणि देशाची पारतंत्र्यातून त्यांनी केलेली सुटका हे सर्वाना ज्ञात आहे.

दही.. एक जगणे

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटस् अपवर स्वार होऊन रोज नवनवे दृष्टान्त, दाखले, उतारे आपल्यावर येऊन आदळतात. मी कधी ते वाचतो, कधी टाळतो.

स्वप्नांचे सौदागर

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींकडे आपण बऱ्याचदा चॅनेल बदलून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. पण तरीही या जाहिराती आपल्याला नसलेली गरज निर्माण करतात.

दिवाळी सरताना..

हा लेखांक प्रसिद्ध होईल तेव्हा दिवाळी सरली असेल. एखाद्या परकऱ्या पोरीने नाचत यावे, तिची लक्ष्मीची पावले अंगणभर उमटावीत, तिच्या पायातल्या पैंजणांच्या नादाने चार दिवस खुळावल्यागत व्हावे, अशी आपली सर्वाची

निकाल लागताना..

मित्रांनो, हा लेख प्रसिद्ध होईल त्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतील. नवे गडी, नवे राज्य उदयास येण्याची मुहूर्तमेढ ठरेल.

दोन सावल्या

ज्याचं प्रतिबिंब बघायचं आम्ही नाकारतो.. तोच आमचा अंतिम क्षण दोन्ही हात पसरून स्वागताला उभा असतो आणि नेमकं त्या क्षणी लक्षात येतं की, द्यायचं राहून गेलं.. मनातलं बोलायचं राहून गेलं..

कानाने गहिरा..

प्रिय वाचकहो, आजच्या ‘जनात-मनात’चा विषय सर्वथा वेगळा आहे. कधी मनात उमटणारे भावनांचे तरंग, कधी वैचारिक द्वंद्व तर कधी घडणाऱ्या गोष्टींचा वेगळ्या अंगाने घेतलेला परामर्श यांतून ‘जनात-मनात’ साकारते आहे.

सरमिसळ

बाबूजींचे गाणे मला नेहमी हेलावून टाकते. मुलीचा बाप होण्याचे सद्भाग्य या जन्मी न लाभल्यामुळे ती अनुभूती या आयुष्यात तरी नाही.

पराभव की प्रगल्भता ?

डॉ डिन्स्कीच्या या वचनाने आज माझ्या मनाचा ठाव घेतला. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते

वन-लाइनर्स

गाडी चालवताना पुढे जाणाऱ्या वाहनांच्या पृष्ठभागावर लिहिलेले ’One liners’ वाचणे हा माझा एक विरंगुळा आहे.

समझोते आणि सर्वोत्तमता

विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांच्या आखणीचे काम चालू होते. कुलगुरूया नात्याने ती माझी थेट जबाबदारी आहे असे मी मानतो.

शू! कोणीतरी आहे तिकडे!

कोकणस्थ असूनही वयाची ५३ वष्रे मी कधी कोकणात गेलो नव्हतो. मुंबई-पुण्यापलीकडे माझा परीघ विस्तारत नव्हता.

भिडेबाई

वर्गातला दिनू बाईंना फारसा कधीच आवडायचा नाही. विस्कटलेले केस, तेलाचा लवलेश नाही, बटणे तुटलेला शर्ट, अर्धवट खोचलेला, वरच्या खिशाला पडलेला शाईचा डाग, भकासलेले डोळे, अभ्यासही बेताबेताचा.

आरोग्याची पुढची पाच वर्षे..

‘जनात-मनात’ सुरू होऊन आता सात महिन्यांचा काळ उलटून गेलाय. डिजिटल कम्युनिकेशनमुळे रविवारी आठ-साडेआठ वाजेतो वाचकांचे प्रतिसाद येऊ लागतात.

स्पेक्ट्रॉस्कोपी

माणसाच्या मनातील भावनांची जर स्पेक्ट्रॉस्कोपी केली तर मिळणाऱ्या रिझल्टच्या एका टोकाला प्रेम असेल, तर दुसऱ्या टोकाला राग.

या माझ्या लाडक्या देशात..

पुढच्या दोन आठवडय़ांत आपण आपला ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करू. नवे पंतप्रधान, नवा सोहोळा.. दिल्लीची परेड बघू.

शिडी आणि केळी

अगदी लहानपणापासून आपण सर्वानी हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकलेली आहे. कोणाला हत्ती सुपासारखा, तर कोणाला दोरखंडासारखा, तर कोणाला झाडाच्या बुंध्यासारखा वाटला.

‘ऐ चिकणे, जरा सुनो’

फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साइटस् मी अगदी आवर्जून पाहतो. काही अंशी मला त्यांचे व्यसन लागले आहे, हा आमच्या मातोश्रींचा दावाही खराच आहे.