आवडती पुस्तके
असंख्य पुस्तके आवडलेली आहेत. त्यातील दहा निवडणे अवघड आहे. अशा आवडत्या पुस्तकांनी माझी अभ्यासिका भरली आहे. त्यातील दहा नावे सांगताना इतर आवडलेल्या पुस्तकांवर अन्याय तर होणार नाही ना? त्या प्रिय पुस्तकांची क्षमा मागून..
१) युगान्त – इरावती कर्वे
२) बळी, कळ्यांचे नि:श्वास – विभावरी शिरूरकर
३) प्रासंगिका, पैस – दुर्गा भागवत
४) पासंग – कुसुमावती देशपांडे
५) विस्मृतीचित्रे – अरुणा ढेरे
६) डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
७) श्रीविठ्ठल : एक महासमन्वय – रा. चिं. ढेरे
८) अंतरिक्ष फिरलो, पण.., अपार, बनफूल – म. म. देशपांडे
९) धग – उद्धव शेळके
१०) रेन वेलेक व ऑस्टिन वॉरन यांच्या ‘Theory of Literature’चा ‘साहित्य सिद्धान्त’ हा डॉ. स. गं. मालशे यांनी केलेला मराठी अनुवाद
११) देवनागरी मुद्राक्षर लेखनकला (खंड पहिला) – बापूराव नाईक
१२) काजळमाया – जी. ए. कुलकर्णी
नावडती पुस्तके
नावडती पुस्तके कशाला लक्षात ठेवायची? स्पष्ट बोलण्याने नाराजीचा टॅक्स भरावा लागतो. तो टॅक्स वाचवण्यासाठी हा मुद्दा सोडून देऊ.