ध्वनिमुद्रण तबकडय़ांवर करण्याचा शोध लागून १९ व्या शतकाच्या शेवटी त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याबरोबर शास्त्रज्ञांना हेच ध्वनिमुद्रण अजून कुठल्या मार्गाने करता येईल, याचे वेध लागू लागले. त्याच काळात हलते चित्र दाखवणारे मूकपट तयार होऊ लागले आणि या चित्रांना आवाज कसा द्यायचा याचेही lok03प्रयत्न सुरू झाले. १९२० च्या आसपास थिओडोर वेसने ध्वनीची  दृश्य प्रतिमा (Optical Image) चित्रपटाच्या फिल्मवर मुद्रित करून ते मुद्रित ध्वनी पुन्हा वाजवून दाखवले. ध्वनिलहरींचे विद्युतलहरीत रूपांतर करून या लहरींची दृश्यप्रतिमा चित्रपटासाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्मच्या एका बाजूला मुद्रित केली जाते. मुद्रित ध्वनीची घनता ध्वनिलहरींच्या रुंदी (amplitude) नुसार बदलत जाते.
चित्र. क्र. १ मध्ये चित्रपट्टीत दिसणाऱ्या मुद्रित ध्वनी लहरी जेव्हा दिव्यापुढून सरकत असते, तेव्हा त्यातून पलीकडे जाणाऱ्या प्रकाशकिरणांची तीव्रता मुद्रित लहरींच्या घनतेनुसार बदलते. ही किरणे प्रकाश संवेदनशील (photo sensitive) संवेदक (sensor) पकडतो आणि त्याचे योग्य त्या विद्युत स्पंदात (photovoltaic impulses) रूपांतर करून  प्रोसेसरकडे पाठवतो. प्रोसेसर या विद्युत स्पंदांचे विद्युत संकेतात (signal) रूपांतर करतो आणि पुढे विस्तारकामार्फत ध्वनिवर्धकाकडे पाठवतो आणि आपल्याला चित्राबरोबरच lr04आवाजही ऐकायला येतो. यातूनच स्वतंत्र ध्वनिफितीचा जन्म झाला.
चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करून ध्वनीचे कायमस्वरूपी जतन करण्याच्या शोधाने माहिती जतन करण्याच्या उद्योगाचा पाया घातला. श्राव्य (audio) आणि दृक (video) माध्यमांमध्ये, आधी चुम्बकीय फिती (tapes) आणि नंतर तबकडय़ा (discs) वापरून मुद्रण, पुनर्मुद्रण करणे हे सामान्य लोकांनाही सहज करता येऊ लागले. हे तंत्रज्ञान स्वस्त आणि वापरायला सोपे असल्याने अल्पावधीत लोकप्रिय झाले आणि घराघरातून रेकॉर्ड प्लेयरची जागा टेपरेकॉर्डर घेऊ लागले. टेपरेकॉर्डरमध्ये मुद्रित ध्वनी ऐकणे आणि नको असलेले मुद्रण पुसून त्याच फितीवर नवीन मुद्रण करणे अशी दोन्ही कामे होऊ लागली.
सन १९०० मध्ये वाल्देमर पोल्सनने पोलादी तारेवर ध्वनिमुद्रण करण्याचा शोध लावला. पुढे १९३० च्या सुमारास जर्मन शास्त्रज्ञानी ऑक्साईडचा थर दिलेल्या फितीवर मुद्रण करता येते हे दाखवले आणि दोन रिळे वापरून चालणाऱ्या टेपरेकॉर्डरचा जन्म झाला. १९६४ मध्ये छोटय़ा प्लास्टिकच्या डबीत बसवलेल्या दोन रिळांच्या कॅसेटचा जन्म होईपर्यंत हे मोठे टेपरेकॉर्डर प्रचलित होते.
चित्र क्र. २ मध्ये दोन रिळांचा टेपरेकॉर्डर दाखवला आहे. प्रथम आपण ही ध्वनिफीत कशी असते आणि त्यावर ध्वनिमुद्रण कसे होते ते पाहू. प्लास्टिकच्या पातळ फितीवर फेरिक ऑक्साईडचा (Fe2O3) थर देऊन ध्वनिफीत तयार होते. हा थर फितीवर धरून राहण्यासाठी जे रसायन वापरतात ते ध्वनिफीत चालवताना वंगणाचे काम करून फितीची झीज होऊ देत नाही. फेरिक ऑक्साईड हा चुंबकीय धातू असल्याने चुंबकीय क्षेत्रात आल्याबरोबर त्याच्यात कायमस्वरूपी चुंबकाचे गुणधर्म येतात. यामुळे ध्वनिफितीवर आपल्याला हवे ते मुद्रित करता येते, कायमस्वरूपी साठवता येते आणि कधीही पुसता येते.
ध्वनिफितीवर ध्वनिमुद्रण करण्याचे तंत्र अगदी सोपे आणि साध्या वॉकमनपासून ते मोठय़ा सिस्टीमपर्यंत सारखेच आहे. यासाठी विद्युत चुंबकाचा उपयोग केला जातो. चित्र क्र. ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे, छोटय़ा वाटाण्याच्या आकाराचा हा विद्युत चुंबक म्हणजे तार गुंडाळलेला, लोखंडाचा मध्ये फट असलेला गोल तुकडा असतो. lr06 lr07 ध्वनिमुद्रण करतेवेळी (चित्र.क्र. ३ आणि ४),
– विद्युत चुंबकाला गुंडाळलेल्या तारेमध्ये विद्युत संकेतामध्ये रूपांतरित ध्वनी संकेत येतात.
– त्यामुळे लोखंडाच्या तुकडय़ाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे क्षेत्र तुकडय़ावरील फटीत (निळ्या रंगात दाखवल्याप्रमाणे) चुंबकीय प्रवाह (flux) तयार करतो.
– हा प्रवाह फितीवरील ऑक्साईडचे चुंबकीकरण करतो आणि ध्वनीचे चुंबकीय मुद्रण होते. ध्वनिसंकेतातील फरकानुसार फितीवरील चुंबकीय आराखडा बदलता असतो.lr08जेव्हा मुद्रित ध्वनी ऐकायचा असेल तेव्हा (चित्र क्र. ५)
– सरकत्या फितीवरील बदलता चुंबकीय आराखडा फटीसमोर येतो.
– त्यामुळे बदलते चुंबकीय क्षेत्र तयार होते. ते तारेमध्ये विद्युत संकेत तयार करते.
– हे संकेत विस्तारका (Amplifier)मार्फत ध्वनिवर्धकाकडे पोचतात आणि आपण मुद्रित ध्वनी ऐकू शकतो.
– टेपरेकॉर्डरमध्ये तीन विद्युतचुंबके असतात. lr09 lr10१. खोडणारे चुंबक (Erase Head) – या चुंबकाला जास्त रुंदीचे उच्च वारंवारिता असलेले प्रत्यावर्ती (AC) संकेत मिळतात. यातील फटीची रुंदी इतर दोन चुंबकांपेक्षा जास्त असते. मुद्रण करण्यापूर्वी ध्वनिफीत या चुंबकासमोरून जाते आणि आधी मुद्रित केलेले ध्वनी खोडले जातात.
२. मुद्रण करणारे चुंबक – (Recording head) – याला येणारे ध्वनिसंकेत त्यामध्ये ४०-१५० कि. हट्र्झचे बायस संकेत मिसळून अधिक शक्तिशाली केलेले असतात. यातील फटीची रुंदी जेवढी कमी तेवढे ध्वनिमुद्रण चांगले.
३. ध्वनी आराखडा वाचणारे चुंबक (Playing head) – यातून ध्वनिफितीवरील चुंबकीय आराखडा विद्युत संकेतात बदलून ध्वनी ऐकवला जातो. हे चुंबक आणि मुद्रण करणारे चुंबक यात फितीच्या रुंदीच्या दीडपट अंतर असते.
टेपरेकॉर्डरमधील यंत्रणा-
ध्वनिफीत फिरताना ती ४.७६ से.मी/ सेकंद या गतीने फिरते. तिची गती राखण्याचे काम दोन रोलर करतात. त्यातील एक रबरी असतो, त्याला िपच रोलर म्हणतात आणि दुसरा मुख्य रोलर असतो. (चित्र. क्र. ६)िपच रोलर फितीला मुख्य रोलरवर दाबण्याचे काम करतो. मुख्य रोलरला फिरवण्याचे काम एक मोटर करते. टेपरेकॉर्डरमधील इतर दोन मोटर ध्वनिफीत अडकवलेली चक्रे फिरवतात. फीत जेव्हा ‘फास्ट फॉरवर्ड’ किंवा ‘फास्ट रिवाइंड’ करायची असते तेव्हा िपच रोलर फितीपासून लांब सरकतो आणि फीत जलद गतीने फिरू शकते. चित्र. क्र. ७ मध्ये टेपरेकॉर्डरमधील ध्वनिफितीशी निगडित यंत्रणा दाखवली आहे.
ध्वनी ऐकण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. CD,DVD,MP4.. आपल्याला जसा दर्जा हवा तसा देणारे हे पर्याय अधिक लोकप्रिय होत आहेत. कारण त्यांचा सोपेपणा आणि उपलब्धता तसेच मूळ तंत्रज्ञानातील बदल आणि विकास..
दीपक देवधर – dpdeodhar@gmail.com

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…